फॉस्फरस

    दिनांक  15-Jun-2020 21:33:09
|

phosforus_1  H
होमियोपॅथीमध्ये काही औषधे अशी आहेत, ज्यांची लक्षणे व चिन्हे ही ‘कोविड-१९ ’च्या लक्षणांशी मिळतीजुळती आहेत. आज आपण अशाच एक अतिशय महत्त्वाच्या औषधाबद्दल अंशतः माहिती घेणार आहोत. ते औषध म्हणजे ‘फॉस्फरस’ (Phosphorus)). ‘फॉस्फरस’ हे होमियोपॅथीमधील एक महत्त्वाचे औषध आहे.


होमियोपॅथीच्या औषध खजिन्यात पाच हजारांपेक्षाही जास्त औषधांचा खजिना आहे. या खजिन्यात निसर्गातील सर्व उपलब्ध औषधे आहेत. कोरोना विषाणूच्या सर्व लक्षणांच्या आधारे अभ्यास केला असता असे दिसून येते की, होमियोपॅथीमध्ये काही औषधे अशी आहेत, ज्यांची लक्षणे व चिन्हे ही ‘कोविड-१९ ’च्या लक्षणांशी मिळतीजुळती आहेत. आज आपण अशाच एक अतिशय महत्त्वाच्या औषधाबद्दल अंशतः माहिती घेणार आहोत. ते औषध म्हणजे ‘फॉस्फरस’ (Phosphorus)). ‘फॉस्फरस’ हे होमियोपॅथीमधील एक महत्त्वाचे औषध आहे.
फॉस्फरसचा मुख्य प्रभाव हा मुख्यत्वे जठर, आतडी यांच्या श्लेष्मा पटलावर होत असतो. त्याचप्रमाणे मेंदू, चेतारज्जू, नसा यांच्यावरही त्याचा प्रभाव दिसून येतो व त्या प्रकारची लक्षणे शरीरात दिसून येतात. त्याचप्रमाणे रक्तवाहिन्यांचा र्‍हास होऊन रक्तस्राव होतो. रक्त व स्रावाच्या सर्व विकारांवर हे अत्यंत गुणकारी औषध आहे. उंच, सडपातळ बांध्याच्या तसेच नाजूक प्रकृतीच्या लोकांना हे औषध जास्त चांगल्या प्रकारे लागू पडते. अवचितपणे होणारी आजाराची सुरुवात व हळूहळू वाढत जाणारा थकवा व अशक्तपणा यात दिसून येतो. त्याचबरोबर या लक्षणांबरोबरच गंभीर आजाराची लक्षणे दिसून येतात. छातीमध्ये अत्यंत घट्टपणा जाणवत राहतो. फुप्फुसांच्या गंभीर आजारांवर हे औषध फार उपयुक्त आहे. रुग्णाला खालील गोष्टीने त्रास होतो. जसे, दुखर्‍या भागावर झोपल्याने त्रास होतो. डाव्या बाजूस जास्त त्रास होतो. थंड हवा, मोकळी हवा, थंड पाण्यात हात घातल्याने, गरम पदार्थ खाल्ल्यास त्रास होतो. अति भावनिक वातावरणाने त्रास होतो. अचानकपणे बदललेल्या वातावरणाचाही त्रास होतो.
 

वादळी वारे, वादळ, वीज चमकणे या गोष्टींचा त्रास होतो. तसेच खालील गोष्टींमुळे रुग्णाला बरे वाटते. जसे की, खाल्ल्याने, झोपल्याने, थंडपदार्थ खाल्ल्याने, अंधारात रुग्णाला बरे वाटते. तापामध्ये रुग्णाला थंडी वाजून ताप येतो. तापात व थंडी वाजत असतानासुद्धा रुग्णाला बर्फ खावासा वाटतो. रुग्णाला खूप घाम येतो. तापात खोकला येतो. छाती गच्च भरून येते. श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो. थोड्याशा हालचालीने त्रास होतो. घसा व स्वरयंत्रात खवखवते व चुरचुरते, आवाज बसतो व घोगरा होतो. छातीत कफ जमा होतो, श्वास घेताना शिटीसारखा आवाज येतो. खोकून खोकून पोटात दुखू लागते. न्यूमोनियाची लक्षणे दिसू लागतात. फेसाळ, निळसर, खारट कफ बाहेर पडतो. थुंकीतून बर्‍याचदा रक्त पडते. पाण्याची प्रचंड तहान लागते. तापात रुग्णाला फार भीती वाटते. मृत्यूचे भय वाटत राहते. एकटे राहण्याची फार भीती वाटते. सतत कोणाचा तरी सहवास हवाहवासा वाटतो. तापात रुग्णाला आईस्क्रीम खावेसे वाटते. अतिशय थंड पाण्याची तहान लागते. सतत पडून राहावेसे वाटते. फॉस्फरस या प्रचंड मोठ्या औषधाबद्दल ही अत्यल्प माहिती मी दिली आहे. पुढील भागात ‘कोविड-१९ ’च्या लढाईत सामील झालेल्या अशाच आणखीन एका औषधाची माहिती करुन घेऊया.
(क्रमशः)
- डॉ मंदार पाटकर
(लेखक एम.डी होमियोपॅथी आहेत.)
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.