पालघर साधू हत्या निष्पक्ष तपासावर याचिकाकर्त्यांना अविश्वास

11 Jun 2020 18:06:05
Palghar_1  H x







नवी दिल्ली : राज्यातील पालघर साधू हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एनआयएकडे देण्यात यावा, अशी मागणी करणाऱ्या याचिकांवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या संदर्भात राज्य सरकार, महाराष्ट्र डीजीपी, केंद्र सरकार आणि एनआयएला नोटीस जारी करण्यात आले आहे. 


या प्रकरणी पुढील सुनावणी जुलैमध्ये होणार आहे. व्हीडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे झालेल्या सुनावणीवेळी न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठांने या याचिकेवर उत्तर मागितले आहे, सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या याचिकांपैकी एक याचिका साधूंचे परिजन आणि जूना आखाड्याद्वारे दाखल करण्यात आली आहे. याचिकेत स्पष्ट म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकार आणि पोलीसांच्या तपासावर आम्हाला विश्वास नाही. यावेळी साक्षीदारांच्या आत्महत्या प्रकरणी प्रश्न उपस्थित करण्यात आले असून निष्पक्ष तपास होत असल्यावरही शंका घेण्यात आली आहे. 


दुसऱ्या याचिकेत राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएकडे हा तपास वर्ग करण्याची मागणी घनश्याम उपाध्याय यांनी केली आहे. पालघर जिल्ह्यात गडचिंचले या भागात दोन साधू आणि त्यांचा चालक यांची जमावाकडून कट रचून निर्घृण हत्या झाली आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत दीडशे जण अटक आहेत. तर दहा जण किशोरवयीन मुलांचा सामावेश आहे. 


यापूर्वी न्यायालयाने मुंबई पोलीसांकडे या प्रकरणावर उत्तर मागितले होते. न्या. अशोक भूषण आणि संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याचिकाकेवर सुनावणी करताना आरोपींवर कारवाईत दिरंगाई झाल्या प्रकरणी पोलीसांनी केलेल्या कारवाईचा अहवाल मागवला होता. तसेच घटनास्थळी लॉकडाऊनदरम्यान इतका मोठा जमाव कसा जमला, असा प्रश्नही विचारण्यात आला होता.





Powered By Sangraha 9.0