१३ व १४ जून रोजी मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता

11 Jun 2020 16:43:34
Mumbai _1  H x




मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सून ला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले होते. गुरुवारी महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले. याबाबत कुलाबा वेधशाळेने घोषणा केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईत शनिवार आणि रविवार दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.



महाराष्ट्रातील दक्षिण कोकण, दक्षिण मध्य भाग मान्सूनने व्यापला आहे. मान्सून उत्तरेकडे सरकण्यासाठीचे वातावरण अनुकूल असून यामुळे बळीराजा सुखावला आहे. सध्या शेतकऱ्यांची पेरणी सुरु असून मान्सून वेळेआधी दाखल झाला असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. हर्णे, सोलापूर, रामगुंड येथे आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मुंबई, पालघर येथे १३, १४ जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे. तसेच पुढील दोन दिवसांत राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता आहे.




Powered By Sangraha 9.0