कोविडयोद्ध्यांची काळजी घ्या !

    दिनांक  01-Jun-2020 20:30:11
|


praveen darekar_1 &nमुंबई :
कोरोनाबाधितांवर उपचार करून त्यांना साधारण स्थितीत आणणे डॉक्टर, परिचारिका यांचे काम ते इमानेइतबारे करीत आहेत. या कोरोना योद्ध्यांचाही काळजी घ्या, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका अशा सूचना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पालिका प्रशासनाला केल्या.विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सोमवारी गोरेगाव पूर्व येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे उभारण्यात आलेल्या कोविड विलगीकरण केंद्राची पाहणी केली. प्रविण दरेकर यांनी विलगीकरण केंद्राचे डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय अधिकारी यांचे अभिनंदन केले व त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. नेस्को येथील विलगीकरण केंद्रात काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस हे खरे कोविडयोध्दे आहेत. त्यांची काळजी घ्या, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका, तसेच कोविडपासून ते कसे सुरक्षित राहतील याचीही दक्षता घ्या, अशा सूचना तेथील डीन व सह पालिका आयुक्त वाघ्राळकर यांना दरेकर यांनी दिल्या.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.