मुंबईकरांना दिलासा ; रिमझिम पावसाची मध्यरात्र

    दिनांक  01-Jun-2020 09:42:23
|

Mumbai rains_1  
 
मुंबई : मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. रविवारी मध्यरात्री मुंबईतील चेंबूर, कुर्ला, सायन, अंधेरी, दादर, मुंलुंड या परिसरात पहाटेच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. भयाण गर्मीने हैराण झालेल्या मुंबईकरांना यामुळे दिलासा मिळाला आहे. यापूर्वी हवामान खात्याने ८ जूनपर्यंत मान्सून राज्यामध्ये दाखल होण्याचे संकेत दिले होते.
 
 
दक्षिणपूर्व आणि लगतच्या मध्यपूर्व अरबी समुद्र आणि लक्षद्वीप भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे येत्या ४८ तासांमध्ये मुंबईसह ठाणे, पालघर या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. १ जूनला दक्षिण कोकण आणि गोव्यामध्ये मुसळधार किंवा अति मुसळधार पाऊस पडू शकतो. २ आणि ३ जूनला दक्षिण कोकण आणि गोव्यात बहुतेक ठिकाणी हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस असेल तर थोड्या ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.