बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्काराची मोहित भारतीय फाऊंडेशनची तयारी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jun-2020
Total Views |

unclaimed bodies_1 &


मुंबई महापालिका आयुक्तांकडे मागितली परवानगी


मुंबई : कोरानाच्या जागतिक महामारीत मोठ्या संख्येने मृत्यू होत असताना बेवारस मृतदोहांवर अंत्यसंस्कार करण्याची मोहित भारतीय फाऊंडेशनने तयारी दाखवली आहे. मोहित भारतीय यांनी सोमवारी मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेऊन तशी त्यांनी परवानगी मागितली आहे.


मुंबईत मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण सापडत आहेत तसेच मृत्यूही मोठ्या प्रमाणात होत आहेत. मात्र काही मृतांचे नातेवाईक क्वारंटाईन असल्याने त्यांना मृतदेह ताब्यात घेता येत नाही. शिवाय शवागरे फुल असल्याने मृतदेह रुग्णालयाच्या व्हरांड्यात अथवा वॉर्डमध्ये ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात अनेक अचडणी येत आहेत. काही गरीब कुटुंबातील सदस्य त्यांच्या मृत नातेवाईकाला अग्निसंस्कारही करू शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ती जबाबदारी पालिकेलाच पार पाडावी लागते.


एक तर कोरोनाचे मोठ्या प्रमाणात सापडणारे रुग्ण, त्यांच्यावर होणारे उपचार, त्यातच आता येणारा पावसाळा, त्यावेळी उदभवणाऱ्या समस्या, उद्भवणारे पावसाळी आजार यांच्याशी सामना करतानाच बेवारस मृतदेहांवर अंतिम संस्कार करण्याची अतिरिक्त जबाबदारी पालिकेवर येऊन पडते. अशा वेळी एक जबाबदार मुंबईकर या नात्याने महापालिकेला सहकार्य करण्याच्या भावनेने कोरोनाच्या आजाराने मृत पावलेल्या बेवारस मृतदेहांवर अंतिम संस्कार करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी मोहित भारतीय फाऊंडेशनने मुंबई महापालिका आयुक्तांकडे केली आहे.




@@AUTHORINFO_V1@@