कोरोना कहर (भाग-११) - कोरोनावर परिणामकारक ‘युपॅटोरीयम परफोलिअ‍ॅटम’

01 Jun 2020 21:59:30

farma_1  H x W:


‘ब्रायोनिया अल्बा’नंतर अजून एक महत्त्वाचे औषध आहे, जे ‘कोविड-१९’च्या कार्यावर अतिशय परिणामकारक आहे व ते म्हणजे ‘युपॅटोरीयम परफोलिअ‍ॅटम’ (Eupatorium Perfoliatum) ‘युपॅटोरीयम’ची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत. या औषधाचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे अतिशय तीव्र व प्रखर हाडांच्या वेदना होणे. रुग्णाला जणू असे वाटते की, त्याची हाडे मोडत आहे. जबरदस्त हाडांच्या वेदना हे याचे प्रमुख लक्षण आहे.



कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी होमियोपॅथीमध्ये अतिशय गुणकारी अशी औषधे आहेत. ही औषधे जर व्यवस्थित लक्षणांचा अभ्यास करून योग्य शक्तीमध्ये (Potency) तर अतिशय जलद गतीने कार्य करतात. कोरोनाच्या या साथीमध्ये होमियोपॅथीक औषधांची ताकद सर्वांच्या लक्षात येत आहे व या औषधांमुळे अनेक रुग्ण त्वरित बरे होत आहेत. होमियोपॅथी एवढे चांगले काम करत असताना इतर शास्त्रातील काही मंडळी व फार्मा कंपन्या होमियोपॅथी ही ‘Placebo effect' आहे किंवा होमियोपॅथी ही निरुपयोगी आहे, असे लोकांच्या मनावर सारखे बिंबवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्याचबरोबर काही लेखक होमियोपॅथीचा जराही अभ्यास न करता, वृत्तपत्रातून होमियोपॅथीला नावे ठेवत असतात, बदनाम करत असतात. परंतु, अशा लोकांचा हेतू व ढोंगीपणा आता लोकांच्या लक्षात येऊ लागला आहे व अशा ढोंगी लोकांना पुरून होमियोपॅथी जगतकल्याणाचे कार्य करत आहे. असो. ‘ब्रायोनिया अल्बा’नंतर अजून एक महत्त्वाचे औषध आहे, जे ‘कोविड-१९’च्या कार्यावर अतिशय परिणामकारक आहे व ते म्हणजे ‘युपॅटोरीयम परफोलिअ‍ॅटम’ (Eupatorium Perfoliatum) ‘युपॅटोरीयम’ची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत. या औषधाचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे अतिशय तीव्र व प्रखर हाडांच्या वेदना होणे. रुग्णाला जणू असे वाटते की, त्याची हाडे मोडत आहे. जबरदस्त हाडांच्या वेदना हे याचे प्रमुख लक्षण आहे.



- छाती, पाठ आणि हातापायाचे स्नायू हे अतिशय दुखतात.

- या औषधाचा परिणाम यकृतावरही होत असल्याने पित्तकारक लक्षणेही दिसून येतात.

- या लक्षणांचा रुग्ण अतिशय अस्वस्थ असतो व त्यास थंडी वाजत असते व सतत उलटी होईल, अशी भावना होत असते.

- इन्फ्लुएन्झा, सर्दी, डेंग्यू इत्यादी तापांवरही या औषधाचा खूप चांगला उपयोग होतो व हे ताप त्वरित बरे होतात. माझ्या स्वतःच्या अनुभवात मी अनेक डेंग्यूचे रुग्ण या औषधाने बरे केले आहेत.

- शरीराची हालचाल मंदावते, रुग्ण आळसावतो.

- रुग्णाला सतत चक्कर येते. वमन केल्यावर त्यास आराम वाटतो. डोकेदुखीसुद्धा वमनाने बरी होते.
खालील गोष्टीमध्ये रुग्णास त्रास होतो-

- थंड हवा

- ठराविक मुदतीने पुन्हा पुन्हा लक्षणांनी डोके वर काढणे

- सकाळी ७ ते ९मध्ये रुग्णास जास्त त्रास होतो.

- दुखर्‍या भागावर झोपणे.

- थोड्याशा हालचालीनेही रुग्णास त्रास होतो.
तसेच खालील गोष्टींमुळे रुग्णास आराम वाटतो. जसे-

- पित्ताची उलटी झाली की आराम वाटतो.

- उपडे झोपल्याने बरे वाटते.

- संभाषण करत राहिल्याने बरे वाटते.
 
- रुग्ण सतत दुखण्याने कण्हत राहतो.

- रुग्णाची भूक मंदावते, कडवट चव येते व जिभेवर पिवळट थर जमतो. ओठांच्या कोपर्‍यात चीरा पडतात.
 
- या औषधाच्या लक्षणांत रुग्णास फार तहान लागते. थंड पाणी प्यावेसे वाटते. परंतु पाणी प्यायल्यावर उलटी होते.
 
- जेवणाच्या नुसत्या वासाने उलटीची भावना होते. रुग्णाला थंड पदार्थ खावेसे वाटतात. जसे की आईस्क्रीम.
 
- श्वसन संस्थेशी निगडित लक्षणांमध्ये घसा खवखवत राहतो, खोकला येतो. घशात व स्वरयंत्राजवळ सतत खवखवते.

- रुग्णाला जेव्हा ताप येतो तेव्हा त्याचे सर्वांग अतिशय दुखते. ताप उच्च पातळीचा असतो. रुग्णाला फार तहान लागते. तापात सतत उलटीची भावना होते. पाठीमध्ये अचानक थंडी भरते. त्यानंतर उलटी होते.

- सर्वांग जळजळते, घाम येतो व घाम आल्यावर रुग्णाला बरे वाटते. परंतु, रुग्णाला घाम व अतिशय कमी प्रमाणात येतो. अशा प्रकारची लक्षणे रुग्णात दिसल्यास मग तो आजार कुठलाही असो. ‘युपॅटोरीयम परफोलिअ‍ॅटम’ ने तो पूर्ण बरा होतो. पुढील भागात आपण अजून एका सुंदर व उपयोगी अशा औषधांमधून माहिती पाहूया, जी ‘कोविड-१९’च्या आजारावर उपयुक्त आहेत.



- डॉ. मंदार पाटकर
Powered By Sangraha 9.0