हातावर पोट असणाऱ्यांसाठी सचिनची आर्थिक मदत

09 May 2020 19:05:00

sachin tendulkar_1 &
मुंबई : सध्या लॉकडाऊन १७ तारखेपर्यंत वाढवल्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्यांचे हाल होत आहेत. अशामध्ये सर्व स्तरांमधून त्यांना मदत करण्यासाठी लोकं पुढे येत आहेत. अशामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरनेदेखील त्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. त्याने रोजंदारीवर काम करणाऱ्या ४ हजार लोकांना आर्थिक मदत केली आहे. यामध्ये मुंबई महापालिकेत शिक्षण घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या मुलांचाही समावेश आहे.
 
 
 
 
सचिनने ‘हाय ५’ या स्वयंसेवी संस्थेला ही आर्थिक मदत केली आहे. सचिनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर या संस्थेला शुभेच्छा देत, गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी आपण छोटीशी मदत करत असल्याचं सांगितले. सचिनने याआधीही मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सहायता निधीला प्रत्येकी २५ लाखांची मदत केली आहे. तसेच सचिनने मुंबईत ५ हजार लोकांच्या अन्न-धान्याची सोय केली होती.
 
 
Powered By Sangraha 9.0