'घुमकेतू' नवाजुद्दिनची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला!

    दिनांक  09-May-2020 16:06:27
|

Nawazuddin_1  Hओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रदर्शित होणार ‘घुमकेतू’


मुंबई : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा चित्रपट ‘घुमकेतू’ बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटातील नवाजुद्दीनचा पहिला लूक या आज रिलीज करण्यात आला आहे. यात तो एका वेगळ्या स्टाईलमध्ये दिसत आहे. कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे, २२ मे रोजी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म ‘झी ५’ वर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


‘घुमकेतू’ या चित्रपटात नवाझुद्दीन व्यतिरिक्त एला अरुण, अनुराग कश्यप, रघुबीर यादव, स्वानंद किरकिरे, रागिणी खन्ना या कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘घुमकेतू’ हा एक विनोदी धाटणीचा चित्रपट असून, यात नवाजुद्दीन एका लेखकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर अनुराग कश्यप एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. मुंबईत नशीब आजमावण्यासाठी आलेल्या लेखकाभोवती या चित्रपटाची कथा फिरते. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्पेंद्र नाथ मिश्रा यांनी केले आहे.


या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे मुख्य भूमिकेव्यतिरिक्त अमिताभ बच्चन, रणवीर सिंग, सोनाक्षी सिन्हा, चित्रांगदा सिंग, लॉरेन गोटलीब आणि चित्रपट निर्माते निखिल अडवाणी एका विशेष भूमिकेत दिसणार आहेत. एका मुलाखती दरम्यान नवाजुद्दीनने चित्रपटाविषयी बर्याच गोष्टी सांगितल्या. जास्तीत जास्त पडद्यामागून काम करणाऱ्या अनुराग कश्यप सोबत स्क्रीन शेअर केल्याचा आनंद असल्याचेही तो म्हणाला.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.