इरफानच्या आठवणीने दीपिका भावूक!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-May-2020
Total Views |

Deepika_1  H x



इरफान खान सोबत टेनिस खेळतानाचा व्हिडिओ केला शेअर


मुंबई : अभिनेता इरफान खानच्या जाण्याने चित्रपटसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. इरफानने आपल्या अभिनयाने जगभरातील चाहत्यांची मने जिंकून घेतली होती. सगळ्या कलाकारांच्या इरफानसोबत काहीना काही आठवणी जोडलेल्या आहेत. अभिनेत्री दीपिका पदुकोणनही इरफानच्या आठवणीने व्याकूळ झाली आहे.


दीपिकाने ‘पिकू’ चित्रपटादरम्यानचा इरफानचा टेनिस खेळतानाचा व्हिडीओ पोस्ट करत ‘परत या’ असे म्हंटले आहे. दीपिकाने इरफानसह ‘पिकू’ या चित्रपटात काम केले होते. शुक्रवारी, ९ मे रोजी ‘पिकू’ या चित्रपटाला पाच वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने दीपिकाने या चित्रपटातील इरफानच्या आठवणी चाहत्यांसोबत शेअर केल्या. या निमित्ताने इरफान खानसाठी तिने अत्यंत भावूक पोस्ट लिहिली होती. पिकू चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा एक फोटो शेअर करत दीपिकाने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. फोटोसह दीपिकाने पिकू चित्रपटातील गाणे 'लम्हे गुज़र गये' च्या काही ओळी लिहिल्या आहेत. इरफान खान या आपल्या जीवलग मित्राच्या आठवणीत तिने या गाण्यासह खास पोस्ट केली होती.



@@AUTHORINFO_V1@@