पश्चिम व मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

    दिनांक  09-May-2020 18:17:34
|

raiway_1  H x Wमुंबई :
पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या ५६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी (आरपीएफ), लोको पायलटसह निवृत्त कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या ५६ कर्मचाऱ्यांमध्ये मध्य रेल्वेवरील ३६ आणि पश्चिम रेल्वेवरील २० कर्मचारी असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
 

अत्यावश्यक सेवेत काम करणारेच आता कोरोना बाधित होत असल्याचे समोर येत आहे. कोरोनाची लागण झालेल्या कामगारांवर पश्चिम रेल्वेच्या जगजीवनराम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या बाधितांमध्ये रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी अधिक आहेत. त्यापाठोपाठ तांत्रिक विभागातील कर्मचारी, एक्स्प्रेस गाड्यांवरील लोको पायलट, रुग्णालयातील डॉक्टर, निवृत्त कर्मचारी आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करून घरातच क्वारंटाईनमध्ये राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.