'कोरोना'मुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसाला बेस्ट उपक्रमात नोकरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-May-2020
Total Views |
BEST bus_1  H x


मुंबई : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबातील वारसाला नोकरीत समावून घेण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. तसा अध्यादेश बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी काढले आहेत.


बेस्ट उपक्रमातील ६४ कामगारांना आतापर्यंत 'कोरोना'ची लागण झाली आहे. तर चार कामगारांना 'कोरोना'मुळे जीव गमवावा लागला आहे. बेस्ट उपक्रमातील कामगार अत्यावश्यक सेवेत मोडत असून कामगारांना विमा कवच, 'कोरोना'मुळे मृत्यू झाल्यास कुटुंबातील एकाला नोकरी अशा मागण्या कामगार संघटनांनी केल्या होत्या. पालिकेच्या धर्तीवर बेस्ट कामगाराला सुविधा मिळाव्यात अशी मागणी जोर धरु लागली होती. अखेर बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी 'कोरोना'मुळे मृत्यू झालेल्या बेस्ट कामगाराच्या वारसाला नोकरीत समावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. वारसाच्या शिक्षण पात्रतेनुसार तृतीय किंवा चतुर्थ श्रेणी कामगार म्हणून नोकरीत समावून घेतले जाईल, असे स्पष्ट केले आहे.


मृत कामगाराच्या पत्नी, मुलगा अथवा मुलगी यांनाच नोकरी देण्यात येईल. तसेच मृत कामगाराचे लग्न झाले नसल्यास त्याचा भाऊ किंवा अविवाहित बहीण यांना नोकरी समावून घेतले जाईल, असे बागडे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, आतापर्यंत ६४ कामगारांना 'कोरोना'ची लागण झाली. त्यापैकी ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, दोन जणांना आयसीयूत दाखल करण्यात आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@