आयपीएल नाही तर या स्पर्धेने होणार क्रिकेटची सुरुवात...

09 May 2020 16:08:49

bcci cricket_1  
 
 
मुंबई : सध्या कोरोनामुळे सर्व जग थांबले आहे. अशामध्ये क्रिकेटसह अन्य खेळाचेही खूप मोठे नुकसान झाले आहे. अशामध्ये पुन्हा एकदा क्रिकेटचा हंगाम सुरु करणे, हे बिसिसिआय्समोर एक मोठे आव्हान आहे. अशामध्ये आयपीएलची स्पर्धादेखील अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता आयपीएल ऐवजी सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेने भारतामध्ये क्रिकेटचा नवा हंगाम सुरु करावा का? यावर बीसीसीआयचा विचार चालू आहे.
 
गेली अनेक वर्ष सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये युवा क्रिकेटपटूचा सर्वाधिक समावेश असतो. जगभरामध्ये कोरोणाचा चांगलाच फटका बसल्यामुळे इतर देशातील खेळाडू आयपीएलसाठी भारतात येतील की नाही ही शंकाच आहे. एकही परदेशी खेळाडू न खेळवता आयपीएल खेळवणे म्हणजे तसे धोकादायकच. त्यामुळे आयपीएल कधी सुरु होईल याबाबतीत काही सांगणे कठीण आहे.
 
मात्र, कोरोनाचा हा उद्रेक कमी झाल्यानंतर क्रिकेटची मरगळ निघून जावी यासाठी लवकरात लवकर काही तरी पाउले उचालली जावी यासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. अशामध्ये बीसीसीआयटने थेट आयपीएल सुरु न करता सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धा खेळवण्याचा विचार केला आहे. या स्पर्धेमुळे भारतीय क्रिकेटपटूंना चांगलाच सराव करण्याची संधी मिळेल. त्याचबरोबर देशात चांगले क्रिकेटचे वातावरण तयार होऊन या सर्व गोष्टींचा फायदा आयपीएलला मिळू शकतो. लॉकडाऊन संपल्यानंतर बीसीसीआय या स्पर्धेच्या तयारीला लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0