मुंबईत कर्तव्यावर असलेल्या दोन पोलिसांवर चाकूहल्ला

    दिनांक  09-May-2020 14:11:04
|

mumbai police_1 &nbs


माथेफिरू हल्लेखोरास पोलिसांनी केली अटक


मुंबई : एका २७ वर्षीय माथेफिरू व्यक्तीने केलेल्या चाकूहल्यात दोन मुंबई पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. ही घटना दक्षिण मुंबई परिसरात शनिवारी पहाटे घडली. करण प्रदीप नायर असे हल्लेखोराचे नाव असून, तो सिल्व्हर ओक इस्टेटमधील रहिवासी असल्याचे समजते आहे. ब्रीच कँडी येथे कर्व्यावर असलेल्या पोलीसांवर प्रदीप याने हल्ला केला. या परिसरात पोलीस नाकाबंदीचे कर्तव्य बजावत होते.


मरीन ड्राईव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मृत्युंजय हिरेमठ यांनी एका वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले की, ही घटना मध्यरात्री १.३० च्या सुमारास घडली. ही घटना घडली तेव्हा ब्रीच कँडी परिसरात पोलीसांनी नाकाबंदी केली होती. ही नाकाबंदी हा पोलिसांच्या नियमीत कर्तव्याचा भाग आहे. हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यात पोलीसांच्या खांद्याला आणि हाताला मोठी दुखापत झाली आहे. सध्या त्यांच्यावर जे जे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


पोलिसांनी रात्रीच्या वेळी एक मोठा सुरा घेऊन फिरताना एका व्यक्तिला पाहिले. त्या व्यक्तीला पोलिसांनी हटकले असता तो पळू लागला. पोलिसांनी त्याला पाठलाग करुन पकडण्याचा प्रयत्न केला. हा पाठलाग सुरु असताना प्राणसुखलाल मफतलाल हिंदू जलतरण तलावाजवळ हा व्यक्ती थांबला. त्याने पोलिसांना धमकवण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्याच्या धमकीला न घाबरता त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने पोलीस कर्मचाऱ्यांवर हातातील चाकूने हल्ला केला. दरम्यान हल्लेखोर करण प्रदीप नायर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न), बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणे यांसह विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.