इटलीची चिनी चूक आणि भारताला धडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-May-2020   
Total Views |


china_1  H x W:


कर्जाच्या जीवघेण्या ओझ्याखाली दबलेला इटली
, चीनला होणारी निर्यात वाढवून व चिनी गुंतवणुकीला आकर्षित करून मरगळलेल्या स्वतःच्या अर्थव्यवस्थेत नवीन प्राण फुंकायचे स्वप्न बघत होता.  तो  चीनवर अवलंबून आहे व चिनी भांडवल हे इटालियन अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. दुर्दैवाने चिनी गुंतवणूक आकर्षित करण्याच्या नादात इटलीने स्वतःच्या जनतेला गंभीर संकटात लोटल्याचे दिसते आहे.


इटलीमधील कोरोनाचा उद्रेक हा निव्वळ योगायोग, रुग्णांचा वयोगट किंवा इटालियन नागरिकांचा चिन्यांप्रती सहृदय दृष्टिकोन नसून, चीनच्या हातातले खेळणे बनलेले इटलीचे नेतृत्वच यासाठी जबाबदार आहे. वुहानमधील कोरोना व्हायरसच्या साथीचा प्रसार व गांभीर्य याबद्दल जगाला अंधारात ठेवल्यामुळे अनेक स्थलांतरित कामगारांचे चीनला जाणे-येणे अनिर्बंध सुरूच होते. १ फेब्रुवारी २०२० ला फ्लोरेन्सच्या महापौरांनी एका चिन्यास आलिंगनदेऊन मोहिमेचा प्रारंभ केला. ४ फेब्रुवारीला प्रसारित झालेला तो व्हिडिओ चीन सरकारने बनवला होता. मतपेटीच्या राजकारणासाठी, जनजागृतीच्या नावाखाली इटालियन शासनाने कोरोनाच्या गांभीर्याकडे दुर्लक्ष करून इटलीतील लक्षावधी चिनी स्थलांतरितांपैकी, जे तिथे राहात होते किंवा नुकतेच चीनला जाऊन परतले होते किंवा नुकतेच चीनवरून इटलीत स्थलांतरित झाले होते, त्यांच्यापैकी कोणा एकालाही आलिंगन देण्यासाठी प्रेरित केले.



इटालियन ग्रामीण भागातून विस्थापित चिनी स्थापित


ट्रेसी बियान्झ हे इटलीमधील एक प्रसिद्ध पत्रकार आहेत आणि
अनकव्हर डीसीचे संस्थापक संपादक आहेत. प्रस्तुत लेख त्यांच्या लिखाणावर आधारित आहे. तीस वर्षांपूर्वी इटलीमध्ये अवैध घुसखोरांच्या प्रश्नाची सुरुवात झाली. इटलीने त्यांच्या शहरं व ग्रामीण भागातील वस्त्रोद्योगामध्ये कमी पगारावर काम करण्यासाठी चिनी लोकांची भरती सुरू केली होती. चिन्यांनी मात्र इटालियन पद्धतीच्या वस्त्रनिर्माणाचे तंत्र फारच झपाट्याने आत्मसात केले व मूळ इटालियन वस्त्रोद्योगाची वाट लावली. मेड इन इटलीचे लेबल कायम ठेवून चिन्यांनी इटलीचा वस्त्रोद्योग बळकावला.


इटलीमध्ये हजारो चिनी कामगार
, चीनमधून आयात केलेला कच्चा माल वापरून स्वस्त कपडे, पादत्राणं व तत्सम उत्पादनं बनवून जगभरात स्वस्त किमतीत विकत. पिढ्यान्पिढ्यांपासून वस्त्रोद्योग करणार्‍या इटालियन कुटुंबांना ग्रामीण भागातून विस्थापित करून त्या परिसराला चिन्यांनी स्वतःची वसाहतच बनवून टाकले. चिनी करचुकवेगिरीमध्ये वस्ताद होते. इटालियन लोकांना सर्व प्रकारचे कर व कामगारहिताचे नियम पाळावे लागत असतानाच, चिन्यांनी मात्र करचुकवेगिरी करून, कामगारांसंबंधी नियम, कायद्यांना धाब्यावर बसवून व अवैध मानवी वाहतूक करवून लवकरच स्वतःचा व्यापार भरभराटीस आणला.


.७८ अब्ज डॉलर्स इटलीहून चीनमध्ये पाठवले


२०१७ मध्ये बँक ऑफ चायनाने त्यांच्या मिलान येथील शाखेचे धनशोधनाचे (लाँडरिंगचे) एक प्रकरण निस्तरण्यासाठी ६०००
,००० युरोचा दंड भरायचे मान्य केले. फ्लोरेन्स व प्राटोमध्ये राहणार्‍या चिन्यांनी २००६ ते २०१० या काळात ४.५ अब्ज युरोपेक्षाही (४.७८ अब्ज डॉलर्स) अधिक पैसे इटलीहून चीनमध्ये पाठवले. तपास अधिकार्‍यांच्या मते, चीनला पाठवला गेलेला पैसा हा अवैध मार्गांनी जसे- नकली चलन, अफरातफर, अवैध कामगार व करबुडवेगिरीच्या मार्गाने आला होता. भ्रष्टाचाराचे हे चक्र असेच सुरू राहिले.


इटली चीनच्या
वन बेल्ट वन रोडप्रकल्पात सहभागी


२०१९ ला जेव्हा
वन बेल्ट वन रोडप्रकल्पाची सुरुवात झाली, तेव्हा इटलीने चीनसोबत जगाला प्रभावित करणार्‍या त्यांच्या प्रकल्पात सहभागाची इच्छा दर्शवली. आर्थिक सहकार्याच्या रूपात चीनने उत्तर इटलीचे ट्रिरएस्टा बंदर विकसित करून स्वतः वापर करायला सुरुवात केली. प्रकल्पामुळे चिनी कच्चा माल व उत्पादनांच्या वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधांमध्ये प्रचंड गुंतवणूक झाली. कर्जाच्या जीवघेण्या ओझ्याखाली दबलेला इटली, चीनला होणारी निर्यात वाढवून व चिनी गुंतवणुकीला आकर्षित करून मरगळलेल्या स्वतःच्या अर्थव्यवस्थेत नवीन प्राण फुंकायचे स्वप्न बघत होता. तो चीनवर अवलंबून आहे व चिनी भांडवल हे इटालियन अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. दुर्दैवाने चिनी गुंतवणूक आकर्षित करण्याच्या नादात इटलीने स्वतःच्या जनतेला गंभीर संकटात लोटल्याचे दिसते आहे. आता मानवीय दृष्टिकोनातून मदत करण्याऐवजी चीन इटलीमधली आपली गुंतवणूक सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतोय. इटलीला जाणार्‍या प्रचंड मदत व साहित्य सामग्रीच्या पुरवठ्याचे कारण यामुळे स्पष्ट होतंय.


इटलीमध्येच कोरोनाचा एवढा उद्रेक का
?


वेगवेगळ्या घटनांमुळे इटलीमध्ये चिनी लोकांची संख्या पुष्कळच वाढली आहे. याशिवाय वेगवेगळ्या कारणाकरिता इटलीमधून चिनी चीनमध्ये जातात आणि तिथून अनेक इटलीमध्ये परत येतात. हे सगळे व्हायरसला इटलीमध्ये पसरवण्यासाठी जबाबदार आहेत. अर्थात
, अनेक इटालियनसुद्धा वेगवेगळ्या कारणामुळे चीनमध्ये जात असतात. यांच्या अनिर्बंधित जाण्या-येण्यामुळे व्हायरसचा प्रसार झाला. अमेरिकेनंतर इटलीमध्ये सर्वात जास्त कोरोनामुळे मृत्यू झालेले आहेत आणि कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्यापण आहे. इटलीमध्ये आज २९,०७९ चा मृत्यू व एकूण रुग्ण २,११९३८ (५ मे २०२० पर्यंतची आकडेवारी) आहे.


इटलीमध्ये वृद्धांच्या लोकसंख्याधिक्यासोबतच चीनच्या दबावात असलेले सरकार आहे. त्या सरकारने चीनच्या दबावाखालीच चिन्यांपासून सामाजिक अंतर राखण्याच्या प्रयत्नांना खीळ घातली. इटलीतील घटनाक्रमाला समजून घेण्यासाठी खालील गोष्टी बघायला हव्या.
गेल्या काही महिन्यांत चीनचा वाढता जागतिक प्रभाव सर्वसामान्यांच्या दृष्टिपथात येत असतानाच अगदी अमेरिकनांनादेखील औषधींसारख्या जीवनावश्यक गोष्टीच्या पुरवठ्यासाठी चीनवरचे अवलंबित्व जाणवायला लागले आहे. वुहानच्या कोरोना व्हायरसमुळे चिन्यांच्या गत काही दशकांपासून गृहोपयोगी सुविधांद्वारे नकळत अमेरिका आणि युरोपमध्ये घुसून आपल्या जीवनावश्यक बाबींवर नियंत्रण मिळवण्याच्या कुटिल हेतूंची जाणीव आपल्याला होतेय, एवढाच एक चांगला परिणाम होय.



अशाप्रकारची कारवाई भारतामध्ये करण्यात आली

जशी घुसखोरी इटलीमध्ये करण्यात आली, तशी भारतामध्ये या आधी कधी झाली होती का? त्याचे उत्तर आहे हो. गुप्तहेर संस्था केजीबीयांच्या एका महत्त्वाच्या अधिकार्‍याने मेट्रोखिन आर्काइव्हम्हणून पुस्तक प्रकाशित केले. मेट्रोखिन आर्काइव्हहा केजीबीवसिली मित्र्र्ोखिन यांनी तीस वर्षांच्या विदेश गुप्तचर सेवेतील आणि प्रथम मुख्य संचालनालयाच्या केजीबी आर्काइव्हिस्टम्हणून गुप्तपणे केलेल्या हस्तलिखित नोटांचा संग्रह आहे. यामध्ये रशियन गुप्तहेर संस्था परदेशामध्ये कशाप्रकारे या देशाच्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये कशी घुसखोरी करायची, सरकारे बदलायची आणि रशियाला सोयीस्कर असे नियम बनवायचे, यावर त्यांनी मोठे लिखाण केले. मध्येच अशा प्रकारची कारवाई भारतामध्येही करण्यात आली. यामध्ये नावे देत, कुठले राजकीय पुढारी केजीबीया गुप्तहेर संस्थेने आर्थिक मदत करून कसे फितूर केले होते याची माहिती दिली आहे.



भारताला काय शिकता येईल
?

इटलीमध्ये जे घडले त्यापासून भारताला काय शिकता येईल? चीनने इटलीमध्ये आर्थिक घुसखोरी करायला सुरुवात केली. स्वस्त मजुरीकरिता चिनी नागरिकांना इटलीमध्ये आणण्यात आले. नंतर याचे लोंढ्यामध्ये रूपांतर झाले. अजून जास्त प्रमाणामध्ये चिनी नागरिकांनी घुसखोरी केली, काही घुसखोरी ही कायदेशीर आणि बरीचशी घुसखोरी ही बेकायदेशीर होती (बांगलादेशींच्या बाबतीमध्ये भारतामध्ये घडत आहे). पुष्कळशी अर्थव्यवस्था ही चिनी ताब्यात गेली. अर्थव्यवस्था खालावत होती आणि त्यांच्यावर असलेले कर्जाचे प्रमाण वाढत होते. इटलीला वाटायला लागले की, जर त्यांची अर्थव्यवस्था मजबूत करायची असेल तर चीनशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. नव्हे, तर चीनने तिथल्या राजकीय पक्षांमध्ये, वर्तमानपत्र, मीडिया आणि तथाकथित उदारमतवादी तज्ज्ञांच्या मनामध्येसुद्धा घुसखोरी केली, ज्यामुळे इटलीची धोरणे चीनला अनुकूल अशी बनवता आली. यामुळे चीनचा अजूनच जास्त आर्थिक फायदा झाला. म्हणजेच या सगळ्यामुळे आणि इटलीच्या चिनीप्रेमी राजकारणामुळे, उदारमतवादामुळे चीनचे प्रस्थ इटलीमध्ये प्रचंड वाढले. त्यानंतर त्यावर नियंत्रण करणे हे राज्यकर्त्यांना जवळजवळ अशक्य झाले.



असाच प्रकार भारतामध्येसुद्धा केला जाऊ शकतो
, यावर आपण लक्ष ठेवतो आहे का? आपण जास्त सावध राहायची गरज आहे. चिनी प्रभाव आपल्या मीडियामध्ये, तज्ज्ञांच्या मनामध्ये, राजकीय पक्षांमध्ये घुसखोरीपासून थांबवण्याचे प्रयत्न करणे गरजेचे आहे, नाही तर चीन भारतालासुद्धा इटलीप्रमाणेच गिळंकृत करण्याचा प्रयत्न करेल. आपली अर्थव्यवस्था इटलीपेक्षा पुष्कळ जास्त मोठी आहे म्हणून भारताचा इटली करण्याकरिता चीनला पुष्कळ प्रयत्न करावे लागतील. पण, तरीही आपण सावध राहायला पाहिजे...


@@AUTHORINFO_V1@@