चाचाभतीजा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-May-2020
Total Views |

 bushroad_1  H


बुशरोड काका हे वेमाऊथ बँकेचे केवळ संस्थापकच नव्हते, तर आधारस्तंभ होते. आता हा एकच आधारस्तंभ उरला होता. काकांनी थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल साठ वर्षे या बँकेच्या सेवेत व्यतीत केली होती. बँक हे त्यांचे सर्वस्व होते. बँकेच्या लेजरमधल्या नव्या कोर्याय पानांप्रमाणे काकांचं अंतरंग शुभ्रधवल होतं आणि बँकेसाठी राबताराबता त्यांची त्वचा रापून बँकेतल्या महोगनी लाकडाच्या फर्निचरप्रमाणे तांबूस काळसर झाली होती.


बुशरोड काका हे वेमाऊथ बँकेचे केवळ संस्थापकच नव्हते, तर आधारस्तंभ होते. आता हा एकच आधारस्तंभ उरला होता. काकांनी थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल साठ वर्षे या बँकेच्या सेवेत व्यतीत केली होती. बँक हे त्यांचे सर्वस्व होते. बँकेच्या लेजरमधल्या नव्या कोर्याय पानांप्रमाणे काकांचं अंतरंग शुभ्रधवल होतं आणि बँकेसाठी राबताराबता त्यांची त्वचा रापून बँकेतल्या महोगनी लाकडाच्या फर्निचरप्रमाणे तांबूस काळसर झाली होती.


सदर्न व्हॅलीच्या निसर्गरम्य परिसरातल्या वेमाऊथव्हिल या चिमुकल्या गावात तीन बँका होत्या. त्यातल्या दोन डबघाईला आलेल्या. वेमाऊथ बँकच सुस्थितीत होती. ती वेमाऊथ कुटुंबाच्या, काकांच्या नावानेच ओळखली जाई. वेमाऊथव्हिलमध्ये या कुटुंबांची आलिशान हवेली होती. तिच्या एका भागात विद्यमान ‘तरुण’ आणि विधुर अध्यक्ष रॉबर्ट वेमाऊथ (वय अवघे ६२), त्याची विधवा कन्या लेटी आणि नातवंडे राहात. दुसर्या भागात काका आणि मलिंदीकाकू राहात. वरच्या मजल्यावर रोखपाल विल्यम वेमाऊथ आणि त्याची पत्नी.


अलीकडे काकांना बँकेची चिंता भेडसावू लागली होती. गुदस्ता पत्नी निवर्तल्यापासून रॉबर्टचं बँकेच्या कामात लक्ष लागत नव्हतं. एक तर तो मुळात जरा खुशालचेंडू. भरीस भर म्हणून मद्यपानाचीही सवय. त्याला मासेमारीचाही छंद होता. सुट्टीच्या दिवशी तो मासेमारीसाठी रीडी लेक या गावी जायचा. तिथे त्याचा जज आर्चिना नावाचा न्यायालयातून निवृत्त झालेला मित्र होता.


गेल्या काही दिवसात बँकेतल्या ठेवींची संख्या घटली होती. एनपीए कर्जांचं प्रमाण वाढलं होतं. लेटी आणि तिच्या मुलांनी काकांपाशी याची वाच्यता केली होती. नव्वदीपार काका देखील खचले होते. त्यांना कामाचा व्याप पेलत नव्हता. उतारवयातले दोन दोस्त म्हणजे ‘सांधेदुखी’ आणि ‘निद्रानाश’ त्यांना रात्री झोपू देत नसत. मग ते बँकेत जाऊन काम करीत बसायचे.


शनिवार उजाडला नि मावळला. रात्री ११ वाजता रॉबर्ट रीडी लेकसाठी रवाना झाला. काकांना अचानक आठवलं. दुपारी दलाईन हॉस्कीन्स नावाची खातेदार पासबुकात वर्षभरच्या नोंदी भरून घ्यायला आली होती. तिला उद्या सकाळी यायला सांगितलं आहे. तिचं काम करून ठेवायला हवं. त्यांनी कपडे बदलले. पत्नीने त्यांना हटकलं. पण तिला न जुमानता म्हातारबुवा काठी टेकत निघाले.


वेमाऊथ निद्रेच्या कुशीत होते. रस्ते निर्मनुष्य. खांबांवरचे कंदील मिणमिणत होते. बँकेचं मागचं दार उघडून काका आत शिरले आणि केबिनमध्ये जाऊन दिवा लावून कामाला बसले. अचानक त्यांना चाहूल लागली.


कोणीतरी पुढच्या दाराचं कुलूप काढीत होतं. काकांनी दिवा मालवला व दबा धरून बसले. त्यांचं हृदय धडधडू लागलं. बँकेची रोकड तिजोरीत कुलूपबंद होती. पण, तिजोरीबाहेर चांदीच्या नाण्यांची गोणी सीलबंद करून ठेवली होती.


दार उघडून करड्या रंगाच्या सुटातली उंच आकृती प्रवेशली. विजेरी पेटवून ती तिजोरीच्या खोलीत आली आणि गोणी घेऊन बाहेर आली. विजेरी विझवून ती मुख्य दार उघडून बाहेर निघाली.


काका स्तंभित झाले. तो रॉबर्ट होता. त्यांचा पुतण्या, बँकेचा अध्यक्ष. माय गॉड. गेली साठ वर्षे आपल्या घराण्यानं ज्या बँकेसाठी खस्ता खाल्ल्या, तिथंच पुतण्यानं दरोडा घालावा...


रॉबर्ट गोणी घेऊन बाहेर पडला आणि कुलूप लावून निघून गेला. दुखर्याड अंगाची पर्वा न करता काकादेखील उठले आणि मागच्या दाराने बाहेर पडले. कुलूप लावून मुख्य रस्त्यावर आले. रॉबर्ट गायब. मग त्यांना आठवलं. तो आज रीडी लेकला जाणार आहे. ती आगगाडी रात्री साडेबाराला सुटेल. ते स्टेशनकडे धावले. 


सापडला. एका बाकावर बसून रॉबर्ट सिगार ओढत होता. गोणी त्याच्या शेजारीच होती. काकांना बघून तो चकित झाला.
“काका, या अपरात्री तुम्ही इथं काय करताय?”
“हे मी तुला विचारायला हवं.”
“मी नेहमीप्रमाणे रीडी लेकला चाललोय.”
“रॉबर्ट, तुला हे करताना जराही लाज वाटली नाही?”
“काहीतरीच काय बोलताय?”
“चांगलाच निर्ढावला आहेस की तू. पण, तुझ्या जन्माआधीपासून मी आणि तुझ्या बापाने बँकेसाठी रक्ताचे पाणी केले आहे. ते हा प्रसंग बघण्यासाठी नाही.”
 
“काका, या विषयावर वाद घालण्यासाठी तुम्हाला हीच वेळ मिळाली का?” रॉबर्ट चिडून बोलला.


“जास्त बोलू नकोस. मघाशी तू बँकेत आलास तेव्हा मी तिथेच होतो. तुझं कृत्य मी पाहिलेलं आहे. काय वाट्टेल ते झालं तरी ही गोणी मी तुला नेऊ देणार नाही.”


अंकलनी गोणीला हात घातला. तिकडं फलाटावर आलेल्या गाडीनं शिट्टी दिली. रॉबर्टने क्षणभर विचार केला नि गोणीचा नाद सोडून गाडीकडे धावला. तो आत शिरला नि गाडी सुटली.


“काका, आपण आता मंगळवारी बोलू.”

सकाळी सहा वाजता आगगाडी रीडी लेकला पोहोचली. रॉबर्टच्या स्वागतार्थ आर्चिना गाडी घेऊन आला होता.

“काय रे मोकळ्या हाताने आलास?”

“माल आणला होता रे. पण, अचानक काकांनी अडवलं. त्यांनी गोणी माझ्याकडून काढून घेतली. त्याचंही चुकलं असं म्हणता येणार नाही. प्रवासात विचार करून मी एक निर्णय घेतला आहे.”

“काय?”

“तुझ्याप्रमाणे मीही दारू सोडायचं ठरवलं आहे. पण, या सुट्टीत शेवटची मजा करायची म्हणून त्या गोणीत बीअरच्या डझनभर बाटल्या घेतल्या होत्या. दोनशे डॉलर्स पाण्यात गेले रे.”

“आता त्याचा विचार करू नकोस. आपण सुट्टीचा निर्मळ आनंद घेऊ.”

- विजय तरवडे
(‘The Guardian of the Accolade' या कथेवर आधारित)
@@AUTHORINFO_V1@@