का व्हायरल होतोयं 'या' भाजीवाल्याचा फोटो ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2020
Total Views |
Vegetable Seller_1 &


मुंबई : ट्विटवर एका भाजीविक्रेत्याचा फोटो गेले काही दिवस व्हायरल होत आहे. त्यात एक खास गोष्ट सांगण्यात आली आहे. भाजी विकत असलेला तरुण स्वतः मास्क घालून आहेच, तसेच त्याच्या भाजीविक्रीच्या हातगाडीवर सॅनिटायझरही ठेवण्यात आले आहे.



उपेंद्र राय यांनी हे ट्विट शेअर करत म्हटले कि, "पुस्तके ठरवू शकत नाहीत, कोण किती सुशिक्षित आहे, मी पुस्तकाशिवाय ज्ञानी झालेले आणि शिकलेले अडाणीही पाहिले आहेत." मास्क न घातल्याने अनेकांना दंडही भरावा लागला आहे. यात सुशिक्षित लोकांचा जास्त सामावेश आहे. यामुळेच या भाजीवाल्याचे कौतूक केले जात आहे.




डॉक्टर, पोलीस, आशा वर्कर, नर्स यांच्यावर होणारे हल्ले, थुंकणारे कोरोना रुग्ण, पोलीसांच्या अंगावर विना मास्क धावून येणारे समाजकंटक, पोलीसाचा हात कापणारे हल्लेखोर, मारहाण करणारे गुंड अशा घटनांमध्ये हा एक आशादायी क्षण सुखावणारा आणि कोरोना विरोधात लढण्यासाठी बळ देणारा ठरला आहे.
@@AUTHORINFO_V1@@