महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांची तडकाफडकी बदली

    दिनांक  08-May-2020 18:52:08
|
Pravin Pardeshi _1 &


 

इक्बाल चहल यांची मुंबई महापालिका आयुक्तपदी नेमणूक मुंबई : मुंबईतील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जात असताना राज्य सरकाराने प्रशासनावर खापर फोडत प्रविणसिंह परदेशी यांची तडकाफडकी बदली केली आहे. याबद्दल अधिकृत परीपत्रक जाहीर केले नसले तरीही सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रविणसिंह परदेशी यांना तडकाफडकी हटवण्यात आले आहे. तर अश्विनी भिडे आणि संजीव जयस्वाल यांच्याकडे पालिकेचा अतिरिरक्त प्रभार सोपवण्यात आला आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून  इक्बाल चहल यांची नेमणूक करण्यात आली आहे. 

गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोना रुग्णांच्या राज्य सरकारच्या आकडेवारीत आणि मुंबई महापालिकेतर्फे देण्यात आलेल्या आकडेवारीत तफावत आढळून आली होती. राज्य सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासन यांच्यातील शितयुद्ध गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळेच एका वर्षाच्या आत प्रविणसिंह परदेशी यांची बदली झाल्याचे सांगितले जात आहे. 

लातूर भूकंपाच्या काळात प्रविणसिंह परदेशी यांनी परिस्थिती हाताळत महत्वाची भूमीका बजावली होती. मुंबई महापालिकेचा कारभार स्वीकारल्यानंतर अनेक महत्वकांशी निर्णय परदेशी यांनी घेतले. त्यातच मुंबईची परिस्थिती नाजूक असतानाच अशी बदली होणे यामुळे साऱ्यांच्याच भूवया उंचावल्या आहेत. दरम्यान, मुंबई महापालिकेवर नवनिर्वाचित आयुक्त संजीव जयस्वाल आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्यावर मुंबईतील युद्धजन्य परिस्थितीत महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रविणसिंह परदेशी यांच्याकडे नगर नियोजन खात्याचा कारभार सोपवण्यात आला आहे.प्रवीण परदेशी आयुक्त मुंबई महानगरपालिका यांची नियुक्ती अपर मुख्य सचिव नगर विकास या पदावर करण्यात आली आहे. मनोज सैनिक अपर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम यांचे नियुक्ती अप्पर मुख्य सचिव वित्त या पदावर तसेच किशोर राजे निंबाळकर यांची बदली सचिव सार्वजनिक बांधकाम या पदावर केली असून  ए. एल जराड अतिरिक्त महापालिका आयुक्त बृहन्मुंबई यांची बदली सचिव मदत व पुनर्वसन महसूल व वन विभाग या पदावर बदली करण्यात आली आहे. 

संजीव जयस्वाल यांची नियुक्ती अतिरिक्त महापालिका आयुक्त बृहन्मुंबई या पदावर झाली असून अश्विनी भिडे यांची नियुक्ती अतिरिक्त महापालिका आयुक्त बृहन्मुंबई या पदावर झाली आहे. जयश्री भोज अतिरिक्त महापालिका आयुक्त मुंबई यांची व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ मुंबई या पदावर झाली आहे. आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.