रा.स्व.संघाची 'कोविड सेवा' : देशभरातील ६७ हजार ठिकाणी अखंड मदतकार्य सुरू

    दिनांक  06-May-2020 13:54:01
|
RSS HElp_1  H x
 
 
 

नागपूर : कोरोना महामारीने अवघ्या जगाला विळख्यात घेतले असताना प्रत्येक व्यक्ती, संस्था, कंपन्या आपापल्यापरीने या लढाईत योगदान देत आहेत. देशातील सर्वात मोठे संघटन असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही आपली सर्व ताकद पणाला लावत देशभरातील विविध भागांमध्ये आपले मदतकार्य पोहोचवले आहे.  
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ३ लाख ४३ हजार स्वयंसेवकांनी गरजूंपर्यंत मदत पोहोचवली. देशभरातील दुर्गम आणि खेड्यापाड्यातील ६७ हजार ठिकाणी कोरोना महामारीमुळे उपाशी असलेल्या नागरिकांना रेशन किट्स पोहोचवले. सुमारे ५० लाख कुटूंबे आणि ३ कोटी लोकांच्या रोज जेवणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. रा.स्व.संघातर्फे एकूण ४४ लाख मास्कचे वाटपही करण्यात आले. तसेच गरज असलेल्या ठिकाणी रक्तदान शिबिरही आयोजित करण्यात आले होते.
 
 
 
 
 
 
 
 
एप्रिलमध्ये मुंबईतील मजूर, कामगार आणि गरीब कुटूंबियांपर्यंत आवश्यक ती मदत पोहोचवण्याचे काम संघातर्फे करण्यात आले. तसेच जनकल्याण समिती, केशवसृष्टी आणि मायग्रीन सोसायटीतर्फे एकत्र येऊन 'अन्नपूर्णा योजना' राबवण्यात आली. मुंबईतील एकूण २४ वॉर्डमधील १ लाख २० हजार लोकांना ताजे जेवण दिवसातून दोनवेळा पोहोचवण्याची सोय करण्यात आली. यासाठी एकूण १७ कम्युनिटी किचन उभारण्यात आली आहेत. मुंबई महापालिकेला वाटपासाठी एकूण ४० हजार अन्न पाकीटांचे वितरण करण्यात आले. भुकेल्या मजूरांना तसेच बेघरांना या माध्यमातून दररोज अत्यावश्यक मदत पोहोचवण्याचे काम सतत सुरू आहे. दिल्लीतही अशाप्रकारची मदत विस्थापित मजूरांना पोहोचवण्यात आली आहे. हे सर्व मदतकार्य करताना शिस्त, सातत्य ठेवत सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळण्यात आले होते.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.