कॅबिनेट मंत्र्यांच्या मतदार संघात जनावरांनाही खाण्यायोग्य नसलेले धान्य रेशनवर !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-May-2020
Total Views |

aditya Thackey_1 &nb
 
 

वरळीच्या रेशनिंग दुकानावर प्रविण दरेकर यांची धाड

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघातच नागरिकांना रेशनिंग दुकानातून निकृष्ट दर्जाचे धान्यवाटप करण्यात येत आहे. जनावरांसाठीही खाण्या योग्य नसलेले तांदूळ व गहू वितरित करत असतानाच विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी या रेशन दुकानावर धड टाकली आणि कोरोनासारख्या संकटसमयी नागरिकांना देण्यात येणाऱ्या निकृष्ट धान्याच्या सरकारी वाटपाच्या बेजबाबदार कारभाराचा पर्दाफाश केला. यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.
 
 

Pravin Darekar in Worali
 
वरळी मतदारसंघातील गोपाळ नगर या विभागातील नागरिकांना रेशनिंग दुकानांवर निकृष्ट दर्जाचे गहू व धान्य वाटपाची तक्रार विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्याकडे आली होती. त्यांनी या गंभीर घटनेची दखल घेत त्यांनी बुधवारी आमदार लोढा यांच्यासह थेट वरळी येथील पांडुंरग बुधकर मार्गावरील श्रीमहालक्ष्मी को.ऑप.हौ.सोसायटी येथील तळमजल्यावरील रेशनिंग दुकांनावर (क्र.२० क ६५) धाड टाकली. यावेळी रेशनिंग विभागाचे अधिकारी, पोलिस उपस्थित होते. विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी दुकानवर धाड टाकल्यानंतर रेशनिंग दुकानदाराची भंबेरी उडाली.
 

 
 
त्या दुकानावर निकृष्ट दर्जाचा गहू, तांदुळ उपलब्ध होता. यासंदर्भात दरेकर यांनी तेथे उपस्थित रेशनिंग अधिकारी यांना या गंभीर घटनेची तात्काळ दखल घेऊन दुकानदारावर कारवाई करण्याचे आदेश दिले. रेशनिंगवर मिळणारे हे धान्य निकृष्ट व खराब दर्जाचे असल्याचे दुकानदाराने मान्य केले. पण गेल्या काही दिवसांपासून असेच धान्य आम्हाला मिळत आहे व हेच धान्य आम्ही रेशनिंगवरून वितरित करीत आहोत अशी कबुलीही त्या दुकानदाराने दिली.
 
 
 
यासंदर्भात प्रविण दरेकर यांनी सांगितले की, वरळी येथे राहणाऱ्या काही जणांनी रेशनिंगवरुन वितरित करण्यात येणाऱ्या निकृष्ट धान्याबाबत तक्रार केली होती. हे खराब धान्य खाण्यायोग्य नसल्यामुळ फेकून देणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. यावेळी रेशनिंग कंट्रोलर पगारे यांना या रेशनिंग दुकानावर कारवाई करण्याची सूचना देण्यात आली. कोरोनासारख्या गंभीर परिस्थितीत जनतेला रेशिनिंगवर अश्या प्रकारचे खराब धान्य मिळत असल्याची बाब गंभीर असून यासंदर्भात आपण मुख्यमंत्री व अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 
 
सत्ताधाऱ्यांनी झिडकारले, विरोधकांनी न्याय दिला
 
 
तक्रारदार प्रकाश पोईपकर यांनी सांगतिले की, रेशनिंग दुकानावर निकृष्ट दर्जाचे धान्य मिळाल्यानंतर यासंदर्भात आपण रेशनिंग अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी दाद दिली नाही. तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयात तक्रार करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेतली नाही. मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकानेही या प्रकाराबद्दल आम्हाला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अखेर आम्ही विरोधी पक्ष नेते दरेकर यांच्याकडे दाद मागितली व त्यांनी आम्हाला न्याय मिळवून दिला, असेही पोईपकर यांनी सांगितले. वरळीमधील गोपाळ नगर येथील रेशनिंग दुकानावर विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते यांनी आज धाड टाकली. त्यांच्यासमवेत भाजप मुंबईचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.




Worli Ration Shop - Wheat
@@AUTHORINFO_V1@@