“आणखी बळी जातील, पण अर्थव्यवस्थेला चालना देणे महत्त्वाचे !”

06 May 2020 20:09:46

donald trump_1  
नवी दिल्ली : कोरोना विषाणूमुळे सध्या जास्त नागरिक आजारी पडले किंवा मृत्यू झाले, तरी अमेरिकन नागरिकांनी त्यांचे दैनंदिन कामकाज सुरु करावे, असे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. यामुळे पैसा महत्त्वाचा की नागरिकांचे प्राण हा प्रश्न आता अमेरिकन नागरिकांमध्ये उभा राहिला आहे. एरिझोनामधील फोनिक्स या शहरामध्ये ते बोलत होते. महिन्याभरानंतर वॉशिंग्टनबाहेर त्यांचा हा पहिलाच दौरा होता. कोरोना विषाणूविरोधात आता दुसऱ्या टप्प्याची तयारी सुरु असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले आहे.
 
 
कोरोना विषाणूविरोधात व्हाइट हाऊसने एक टास्क फोर्स बनवली आहे. यामध्ये आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे. ही टास्क फोर्स कार्यान्वित करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूच्या संसार्गावर नियंत्रण मिळवल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिका आता कोरोना व्हायरसविरुद्ध लढाईच्या पुढच्या टप्प्यात आहे. हा सुरक्षित टप्पा असून, हळूहळू काही गोष्टी सुरु होतील, असे ट्रम्प यांनी सांगितले आहे.
 
अमेरिकेमध्ये चीननंतर सर्वाधिक कोरोनाचे बळी गेले आहेत. त्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकवेळा चीनवर गंभीर आरोप केले आहेत. अमेरिकेमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा १२ लाख ३७ हजार ६३३ एवढा आहे. यामुळे ७२,२७१ जणांना प्राण गमवावे लागले. तर आतापर्यंत २ लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामध्ये सर्वाधिक ३,३०,१३९ कोरोनाचे रुग्ण समोर आले आहेत. एकट्या न्यूयॉर्क शहरामध्ये २५,२०४ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर न्यूजर्सीमध्ये १,३१,७०५ कोरोना बाधितांपैकी ८,२९२ लोकांचा मृत्यू झाला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0