मालदिव, युएईतील भारतीयांना आणण्यासाठी नौसेना तयार

05 May 2020 10:42:20
Maldivs _1  H x
 

कोच्ची : कोरोना विषाणू महामारीमुळे दुसऱ्या देशांत अडकलेल्या नागरिकांना पुन्हा भारतात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. मालदीव आणि युएईमध्ये अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी नौसेनेने आपले जहाज पाठवले आहे. केंद्र सरकारने भारतीयांना परत आणण्यासाठी नौदलाची मदत घेणार असल्याची घोषणा केली होती.
 
 
संरक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, 'मालदीव आणि युएईतील नागरिकांना सुखरुप भारतात आणण्यासाठी तीन जहाजे पाठवण्यात आली आहेत. आयएनएस मगरसह आयएनएस जलाशवा सोमवारी रात्री मालदिवसाठी रवाना झाले आहेत. आयएनएस शार्दुल दुबईतील भारतीयांना परत आणण्यासाठी रवाना झाले आहे.' संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'तीन जहाजे लोकांना घेऊन कोच्ची येथे उतरणार आहेत. आयएनएस मगर आणि आयएनएस शार्दुल दक्षिण नौसेनेची जहाज आहेत, तर आयएनएस जलाशवा पूर्व नौसेनेच्या ताफ्यातील जहाजे आहेत.
Powered By Sangraha 9.0