काश्मीर वार्तांकनासाठी तीन छायाचित्रकारांना पुलित्झर पुरस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-May-2020
Total Views |
pulitzer price _1 &n
 
 


 

वॉशिंन्टन : तीन भारतीय छायाचित्रकारांना पत्रकार क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे. तिघेही जम्मू काश्मीरचेच रहिवासी आहेत. कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये केलेल्या वार्तांकनाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला आहे. यासीन डार, मुख्तार खान आणि चन्नी आनंद याना हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. हे तिघेही एपी या वृत्तसंस्थेसाठी काम करतात.
 
 
 
यासिन आणइ मुख्तार श्रीनगरमध्ये राहतात, आनंद जम्मू येथे राहतात. चन्नू आनंद गेल्या २० वर्षांपासून एपी वृत्तसंस्थेसाठी काम करतात. "मी आश्चर्यचकित आहे, मला विश्वास बसत नाही.", अशी प्रतिक्रीया त्यांनी पुरस्कारासाठी नावे घोषित झाल्यानंतर व्यक्त केली आहे. सोमवारी रात्री उशीरा या प्रतिष्ठीत पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
 
 
 
कलम ३७० हटवल्यानंतर तिथली परिस्थिती सुरक्षा कर्मचारी, स्थानिक, तिथली आंदोलने ही माहिती जगासमोर आणल्याबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यासह 'न्यूयॉर्क टाइम्स', 'एन्करेज डेली न्यूज', 'प्रो पब्लिका' यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे. अमेरिकेतील भ्रष्टाचार, कायदा सुव्यवस्था, वर्णभेद याविषयांचा पाठपुरावा करणाऱ्या पत्रकारांना हा पुरस्कार मिळाला आहे. 'न्यूयॉर्क टाइम्स'ला तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
 
 
 
'द न्यु यॉर्कर', 'द वॉशिंगटन पोस्ट', 'असोसिएटेड प्रेस', 'द लॉल एंजिलिस टाइम्स', 'द बाल्टिमोर सन', 'द फीलिस्तीन हेराल्ड प्रेस' यांनाही विविध वृत्तांकनासाठी सन्मानित करण्यात आले आहे. कोरोनी महामारीमुळे गेल्या काही दिवसांपासून पुरस्कार प्रक्रीया स्थगित करण्यात आली होती.
 
 
 
काय आहे पुरस्काराचे स्वरुप ?
 
पुलित्झर पुरस्काराची सुरुवात १९१७मध्ये झाली होती. अमेरिकेचा हा प्रतिष्ठीत पुरस्कार मानला जातो. वृत्तपत्र, साहित्य, संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रदान करण्यात येतो. गतवर्षी हा पुरस्कार 'न्यूयॉर्क टाइम्स' आणि 'वॉल स्ट्रीट जर्नल'ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या परिवारासंदर्भातील माहिती उघड करण्यासंदर्भात देण्यात आला होता.
 
 



 
@@AUTHORINFO_V1@@