कौतुकास्पद ! महिला हॉकीपटूंनी गरजूंसाठी उभारला २० लाखांचा निधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-May-2020
Total Views |

Indian women hockey team_
नवी दिल्ली : देशामध्ये कोरोणाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. ज्यांना शक्य आहे तेवढी मदत कोरोनाबाधित तसेच डॉक्टर, पोलिसांच्या मदतीसाठी लोक पुढे सरसावत आहेत. अशामध्ये भारतीय महिला हॉकी खेळाडूंनीही अनोख्याप्रकारे मदत गोळा करून कोरोनाविरूढ लढण्यासाठी मोठे योगादान केले आहे.
 
 
 
 
 
 
कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी महिला हॉकीपटूंनी २० लाखांचा निधी उभा केला आहे. भारतीय महिला खेळाडूंनी १८ दिवसांचे फिटनेस चॅलेंज स्वीकारले होते. सोशल मीडियाचा वापर करत या महिला खेळाडूंनी प्रत्येकाला गरजू व्यक्तींसाठी १०० रुपये दान करण्याची विनंती केली होती. या माध्यमातून महिला खेळाडूंनी २० लाख १ हजार १३० रुपयांचा निधी जमा केला आहे. नवी दिल्लीतील उदय फाऊंडेशन या सामाजिक संस्थेला ही आर्थिक मदत केली जाणार आहे.
 
 
 
नवी दिल्लीतील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या गरजू व्यक्तींना यामधून मदत केली जाणार आहे. या उपक्रमात सहभागी करुन घेतल्याबद्दल भारतीय हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालने समाधान व्यक्त केले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हॉकी इंडिया आणि आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेनेही आपल्या सर्व महत्वाच्या स्पर्धा रद्द केल्या आहेत. त्यामुळे करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्यानंतर पुन्हा एकदा सामने कधी पहायला मिळणार याची क्रीडाप्रेमी वात बघत आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@