दिल्लीमध्ये दारूवर ७० टक्के कोरोना फी ; सरकारच्या निर्णयाने तळीरामांची निराशा

05 May 2020 14:58:04

dekhi_1  H x W:


नवी दिल्ली : लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली असून सोमवारी अनेक ठिकाणी मद्यविक्रीला सुरुवात करण्यात आली. अनेक ठिकाणी दारूच्या दुकानाबाहेर मोठ्या रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले. अशातच दिल्ली सरकारने दारु विक्रीवर स्पेशल कोरोना फी लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तळीरामांची मात्र चांगलीच पंचायत झाली आहे.
 
 
दिल्लीमध्ये दारूच्या एमआरपीवर ७० टक्के अधिक रक्कम आकरण्यात येणार आहे. मंगळवारीपासून हे नवे दर लागू झाले आहेत. उत्पादन शुल्क आयुक्तांनी पोलिस आयुक्तांना पत्र लिहून, पोलिसांना दारुच्या दुकानांवर कायदा, सुव्यवस्था निर्माण करण्यास मदत करण्याबाबत सांगितले आहे. दिल्लीत सकाळी ९ ते सायंकाळी ६.३० पर्यंत दारुची दुकाने सुरु राहणार आहेत.
 
 
दरम्यान, लॉकडाउनमध्ये काल पहिल्यांदाच मद्यविक्रीला परवानगी देण्यात आल्यानंतर देशभरातील विविध शहरांमध्ये लोकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये देशातल्या अनेक शहरांमध्ये दारूच्या खरेदीसाठी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या.
 
 
Powered By Sangraha 9.0