१० मिनिटांत कोरोना विषाणूचा नायनाट ! डीआरडीओचे तंत्रज्ञान

05 May 2020 13:42:43
DRDO Disinfection Tower_1
 
 
 
 
नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणू संक्रमित रुग्णांची संख्या ४२ हजार ८२६ वर पोहोचली आहे. तसेच १ हजार ३८९ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणू संक्रमणाचा धोका लक्षात घेऊन आता वैज्ञानिक यावर लस, औषधे तसेच इतर उपकरणांची निर्मिती करत आहेत. यातच संरक्षण संशोधन विकास संस्था म्हणजेच डीआरडीओतर्फे खास उपकरण तयार करण्यात आले आहे.



युवी डिसइंफेक्‍टेंट टॉवर, असे याला नाव देण्यात आले असून हे एका खोलीतील विषाणू १० मिनिटांत नष्ट करण्याची क्षमता याला आहे. डीआरडीओने दिलेल्या माहितीनुसार, युवी ब्लास्टरद्वारे कोरोना विषाणूच्या अतिसंवेदनशील क्षेत्रांना कोरोनामुक्त करण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे. दिल्लीतील डीआरडीओच्या प्रयोगशाळा असलेल्या लेझर सायन्स अॅण्ड टेक्‍नोलॉजी सेंटरमध्ये गुरुग्रामची कंपनी 'न्‍यू एज् इन्स्ट्रुमेंट अॅण्ड मटेरिअल्स प्रा.लि. यांच्यासह एकत्र येऊन हे यंत्र तयार करण्यात आले आहे.

 
यूवी ब्‍लास्‍टर हा कॉम्पुटरसह अन्य इलेक्ट्रोनिक उत्पादनांना जंतूरहित करण्यासाठी वापरला जातो. हे उत्पादन एअरपोर्ट, शॉपिंग मॉल, मेट्रो, हॉटेल, फॅक्‍टरी आणि कार्यालयात वापरले जाऊ शकते. वायफायद्वारे याचा वापर केला जाऊ शकतो. चारशे स्वेअर फूटच्या खोलीला ३० मिनिटांत विषाणूमुक्त करण्याची क्षमता या यंत्राची असते.
 
Powered By Sangraha 9.0