पाक वायूदलात पहिल्यांदाच हिंदू पायलटची नियुक्ती

04 May 2020 18:38:35

Pak air force  Rahul Dev_
नवी दिल्ली : एकीकडे भारत – पाकमधले संबंध, तसेच पाकिस्तानचे सीमोल्लंघन आणि पाकमध्ये हिंदू अल्पसंख्यांक लोकांचे होणारे छळ यामुळे पाक आणि पाकिस्तानचे सरकार नेहमीच चर्चेत असते. आता पाकिस्तान एका वेगळ्याच बातमीबद्दल चर्चेत आले आहे. एकीकडे पाकमध्ये हिंदू लोकांचा छळ होत असल्याच्या बातम्या येत असताना, दुसरीकडे मात्र एका हिंदू युवकाचा पाकिस्तान वायुदलामध्ये समावेश करण्यात आला आहे. पाकच्या आजवरच्या इतिहासात एका हिंदू युवकाची वायुसेनेत पायलट म्हणून निवड करण्यात आली आहे.
 
 
 
राहुल देव या युवकांची पाकिस्तानी वायुसेनेत जनरल ड्यूटी पायलट अधिकारी म्हणून भरती करण्यात आली आहे. पाकिस्तानी माध्यमांमध्ये छापण्यात आलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. हा युवक सिंध प्रांतातील सर्वात मोठा जिल्हा असणाऱ्या थरपारकर येथे राहणारा आहे. पाकिस्तानमधील थरपारकर या भागात हिंदू समुदाय मोठ्या संख्येने राहतात. विकासापासून वंचित असलेल्या या भागातील राहुल हा पाकिस्तान वायूदलामध्ये नियुक्ती होणारे पहिलाच हिंदू आहे.
Powered By Sangraha 9.0