'गिलगिट-बाल्टिस्तान खाली करा' : भारताचा पाकला इशारा

    दिनांक  04-May-2020 14:19:54
|

Gilgit _1  H x
 
 

नवी दिल्ली : भारताने गिलगिट-बल्टिस्तानमध्ये होणाऱ्या निवडणूका घेण्याच्या पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला जोरदार विरोध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने याची दखल घेत पाकला खडेबोल सुनावले आहेत. गिलगिट- बाल्टिस्तानसह जम्मू काश्मीर आणि लडाख भारताचा अविभाज्य भाग आहे. पाकिस्तानने या भागांवर कब्जा केला असून त्वरित हा प्रदेश खाली करावा, असे म्हटले आहे.
 
 
 
 
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच एका आदेशात २०१८ मध्ये 'गव्हर्नमेंट ऑफ गिलगिट बाल्टिस्तान ऑर्डर'मध्ये निवडणूका घेता येतील का हे पाहण्याचे आदेश दिले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने एका वक्तव्यात म्हटले आहे. कि, "भारताने पाकिस्तानच्या उच्च न्यायालयातील या आदेशावर आक्षेप घेतला आहे. याला विरोध करत स्पष्टपणे म्हटले आहे कि, केंद्र शासित प्रदेश असलेला संपूर्ण लडाखसह जम्मू आणि काश्मीर यात गिलगिट आणि बाल्टिस्तानचाही सामावेश आहे.
 
 
 
 
हा पूर्णपणे कायदेशीरपणे भारताचा अविभाज्य भाग आहे.पाकिस्तान सरकार आणि त्यांच्या न्यायालयाला आमच्या क्षेत्रात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. बेकायदेशीररित्या ताब्यात घेतलेल्या या भागावर पूर्वीपासूनच भारताचा अधिकार आहे. पाकिस्तानने घेतलेल्या या निर्णयांना भारत कठोर शब्दांत विरोध करत आहे. पाकिस्तानने ताब्यात घेतलेला हा भाग त्यांचा कधीच नव्हता. या क्षेत्रात मानवाधिकारांचे उल्लंघन झाले आहे. नागरिकांचे शोषण करण्यात आले आहे, असे भारताने स्पष्ट केले आहे.


 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.