सर्वात कमी मृत्युदर भारतात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-May-2020   
Total Views |


corona_1  H x W


दिलासादायक बाब म्हणजे भारतात कोरोनाचा मृत्युदर . टक्के इतकाच आहे, म्हणजे १०० बाधितांपैकी चारा जणांचा मृत्यू झाला किंवा प्रति एक लाखामागे .०९ व्यक्तींचा मृत्यू झाला. लोकसंख्येच्या मानाने भारत सर्वात चांगल्या स्थितीत असून कोरोना संक्रमण रोखण्यावरुन कौतुक केल्या जाणाऱ्या दक्षिण कोरियालाही मृत्युदराबाबत भारताने मागे टाकले आहे.


चीनच्या वुहान शहरातून सुरु झालेला कोरोना विषाणूचा संसर्ग आतापर्यंत जगातील १८५ पेक्षा अधिक देशांत पोहोचला. कोरोना विषाणूचा उद्भव कुठून झाला
, यावरुन सातत्याने वाद सुरु असून कोरोना चीनचेच अपत्य, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केला. तसेच यासंबंधीचे ठोस पुरावे आपल्या हाती लागल्याचेही त्यांनी सांगितले. युरोपातील अन्य देशही कोरोनाच्या उत्पत्तीबद्दल चीन व वुहानमधील विषाणू प्रयोगशाळेला जबाबदार धरत आहेत. तसेच चीनने कोरोनाबाबत जगाला सुरुवातीपासूनच अंधारात ठेवले, असा आरोपही या देशांकडून होत आहे.


अमेरिकेने तर नुकतीच आयात-निर्यातीची आकडेवारी जारी करत चीनने नेमका कोणता डाव खेळला
, हे सांगण्याचे काम केले. कोरोनाप्रसार सुरु झाल्यानंतर चीनने निर्यात कमी करत वस्तूंची आयात वाढवली. बिकट परिस्थितीत जीवनावश्यक व वैद्यकीय साहित्य आपल्याजवळ असावे, यासाठी चीनने हे पाऊल उचलल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. अर्थात, अमेरिका किंवा इतर देश केवळ चीनला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करुन थांबलेले नाहीत, तर जगाला एका संक्रामक महामारीचा प्रसाद देणार्‍या चीनला कोरोनानंतरच्या काळात धडा शिकवण्यासाठीही ही राष्ट्रे तयारी करत असून आर्थिक, औद्योगिक क्षेत्रात चीनला पछाडण्याची धोरणेही त्यांनी आखली आहेत.



काही राष्ट्रांनी चीनमधील आपली गुंतवणूक माघारी बोलावण्यासही सुरुवात केली असून अनेकांनी चीनकडे नुकसानभरपाईची मागणीही केली आहे. चीन मात्र कोरोनाची निर्मिती आमच्या प्रयोगशाळेत झालेली नाही
, असेच म्हणताना दिसतो. जागतिक आरोग्य संघटनेनेही चीनची तळी उचललेली आहे. नुकताच चीनने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चिडवत एक अ‍ॅनिमेटेड चित्रफितही प्रसारित केली. यात ट्रम्प यांची चांगलीच खिल्ली उडवण्यात आली आहे. म्हणजेच चीनची धटिंगणशाही कोरोनासारखा घातक रोग जन्माला घातल्यानंतरही सुरुच असल्याचे यातून समजते. तसेच उर्वरित जग व चीनमधील संघर्ष येत्या काळात तीव्र होईल, याची ही नांदी असल्याचेही स्पष्ट होते.



अमेरिका
, युरोपीय देश आणि चीनमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वितुष्ट निर्माण होण्याचे कारण म्हणजे ठप्प झालेली अर्थव्यवस्था आणि हजारोंचे बळी. सर्वच व्यापार-व्यवसाय, उद्योगधंदे, पायाभूत सुविधांचा विकास बंद पडल्याने अर्थव्यवस्थेला मोठे नुकसान सोसावे लागत आहे. अनेकांच्या रोजगारावरही कोरोना कुर्‍हाडीचा वार झाल्याने त्यांना घरी बसावे लागत आहे. त्यातच कोरोनाबाधितांची मृत्युमुखी पडण्याची संख्यादेखील अमेरिका आणि युरोपीय देशांत अधिक आहे. आकडेवारीचा विचार केल्यास मृत्युदराबाबत युरोपीयन देश बेल्जियम सर्वात पुढे असून इथे एकूण कोरोनारुग्णांची संख्या ५० हजारच्या आसपास आहे, तर १५.७ टक्के रुग्णांचा इथे मृत्यू झाला.


तर इटलीमध्ये २ लाख, १० हजारांपेक्षा अधिक कोरोनाग्रस्त असून मृत्युदर १३.६ टक्के इतका आहे. स्पेनमध्ये एकूण रुग्णांची संख्या २ लाख, ४७ हजारांहून अधिक असून मृत्युदर ११.५ टक्के आहे. मृत्युदराच्या बाबतीत या तीन देशानंतर अमेरिका असून तिथे आतापर्यंत ११ लाख, ८८ हजारांपेक्षा अधिक लोक कोरोनाबाधित झाले, तर मृत्युदर ५.९ टक्के इतका आहे. मृत्युदराचा विचार करता अमेरिका, युरोपीय देश, चीन, रशिया किंवा दक्षिण कोरियापेक्षाही सर्वात कमी मृत्युदर भारतात आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने यासंबंधीची आकडेवारी जारी केली असून त्यातून ही बाब स्पष्ट होते.


भारतातीत कोरोनाबाधितांची संख्या आतापर्यंत ४३ हजारांजवळ पोहोचली असून १३०० जणांचा मृत्यू झाला आहे. तथापि
, दिलासादायक बाब म्हणजे भारतात कोरोनाचा मृत्युदर ३.३ टक्के इतकाच आहे, म्हणजे १०० बाधितांपैकी चारा जणांचा मृत्यू झाला किंवा प्रति एक लाखामागे ०.०९ व्यक्तींचा मृत्यू झाला. लोकसंख्येच्या मानाने भारत सर्वात चांगल्या स्थितीत असून कोरोना संक्रमण रोखण्यावरुन कौतुक केल्या जाणार्‍या दक्षिण कोरियालाही मृत्युदराबाबत भारताने मागे टाकले आहे. दक्षिण कोरियातील कोरोना संक्रमितांची संख्या १० हजार, ८००च्या पुढे गेली असून २५० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला. म्हणजेच इथे मृत्युदर २.३ टक्के इतका किंवा प्रतिलाख लोकांत ०.४८ टक्के इतका आहे. भारतानंतर चीनमध्ये सर्वात कमी मृत्युदर असून इथे ८३ हजार, ९०० पेक्षा अधिकजण कोरोनाग्रस्त झाले, तर ५.५ टक्के किंवा प्रतिलाख व्यक्तीमागे ०.३३ टक्के लोकांचा मृत्यू होत आहे. एकूणच भारतीयांच्या दृष्टीने कमी मृत्युदर ही समाधानाची बाब म्हटली पाहिजे.

@@AUTHORINFO_V1@@