पिठाच्या पिशवीतून पैसे वाटण्यावर आमिर खान म्हणतो 'तो मी नव्हेच'!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-May-2020
Total Views |

aamir khan_1  H



सोशल मिडियावरील व्हायरल व्हिडीओचा आमिरने केला खुलासा


मुंबई : भारतामध्ये कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सुरुवातीला २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. अशा परिस्थितीत सगळ्याच कंपन्या बंद आहेत. त्यामुळे कलाक्षेत्रात काम करणाऱ्या विविध कामगारांसमोर सुद्धा मोठे आव्हान उभे राहिले आहे. यासाठी अनेक कलाकार पुढे आले आहेत.


अशातच मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसंबंधी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत आमिर खानने पिठाच्या पिशवीतून १५ हजार रुपये वाटल्याचा दावा कऱण्यात आला होता. यानंतर सोशल मीडियावर आमिर खानची चर्चा सुरु झाली होती. पण आमिर खानने खरंच मदत केली आहे की ही अफवा आहे याबाबत मात्र उलट सुलट चर्चा सुरु होत्या.





आमिर खानने स्वत: ट्विट करुन यासंबंधी खुलासा केला आहे. आमिर खानने ट्विट करत सांगितले की, ‘ती व्यक्ती आपण नाही, पिठाच्या पिशवीत पैसे टाकणारी व्यक्ती मी म्हणून सांगणारा तो व्हिडीओ पूर्णपणे खोटा आहे. किंवा दुसरा कोणीतरी रॉबिनहूड असावा, ज्याला आपली ओळख जाहीर करण्याची इच्छा नाही’.


त्याच बरोबर हा व्हिडिओ इतर कलाकारांच्या नावानेही व्हायरल होत होता. यात आमिरचे नाव आघाडीवर होते. मात्र या व्हिडिओनंतर आमिरने ‘तो मी नव्हेच’ असे म्हंटले आहे. त्यामुळे व्हिडिओ मागचा हिरो नेमका कोण हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.
@@AUTHORINFO_V1@@