बिग बींच्या नातीकडून कोव्हिड योद्धांना मानवंदना!

    दिनांक  04-May-2020 17:40:24
|

aaradhya bhachchan_1 


ऐश्वर्या रायने शेअर केला खास फोटो


मुंबई : कोरोना व्हायरसच्या संकटामध्ये आता डॉक्टर, पोलिस, सफाई कर्मचारी देवदूत बनून सामान्यांच्या मदतीला धावून जात आहेत. अशावेळेस या कोव्हिड योद्धांना प्रत्येकजण त्यांच्या क्षमतेनुसार धन्यवाद मानत आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांची नात, अभिषेक-ऐश्वर्या राय बच्चन यांची लेक आराध्यानेही खास अंदाजामध्ये कोव्हिड योद्ध्यांचे आभार मानले आहेत. आराध्याने एक खास चित्र रेखाटत 'वॉर व्हर्सेस व्हायरस'च्या युद्धामध्ये आघाडीवर असलेल्या पोलिस, सफाई कर्मचारी, पोलिस यांना मानवंदना देत ‘Stay Home Stay Safe’चा संदेश दिला आहे. या खास चित्रामध्ये कोव्हिड योद्धांसोबत शिक्षक, मीडीया कर्मचारी बजावत असलेल्या भूमिकेलाही नमुद केले आहे.

ऐश्वर्या राय बच्चनने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून आराध्याचे हे खास चित्र 'my darling Aaradhya’s Gratitude and Love' या कॅप्शनसह शेअर केले आहे. कोरोना व्हायरसच्या संकटात समाजात जनजागृती करण्यासाठी अमिताभ बच्चन सुरूवातीपासूनच आघाडीवर होते.त्यांनी सरकारसोबतही या आजाराबाबत समाजात जागृती करण्यासाठी काही जाहिरातींमध्ये काम केले. जनता कर्फ्युच्या संध्याकाळी देखील बच्चन कुटुंबाने एकत्र येऊन कोव्हिड योद्धांचे आभार मानले होते.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.