काँग्रेसच्या माजी मंत्र्याचे जंगी स्वागत; सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर!

    दिनांक  31-May-2020 10:02:50
|
Chandrakant handore_1&nbs

कोरोनावर मात करून परतले होते ‘हे’ माजी मंत्री!

मुंबई : एकीकडे मुंबईमध्ये कोरोनाने थैमान घातलेले असताना सोशल डिस्टन्सिंगची प्रचंड आवश्यकता आहे. मात्र कोरोनावर मात करून घरी परतलेले काँग्रेसचे नेते माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या स्वागत कार्यक्रमात मात्र कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम धाब्यावर बसवल्याचा धक्कादायक प्रकार चेंबूरमध्ये उघडकीस आला आहे.


चेंबूर मधील काँग्रेसचे नेते माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर नवी मुंबई येथील रुगणलायत गेले २० दिवस अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तीन चाचण्या पॉझिटिव्ह आल्यानंतर काल चौथी चाचणी निगेटिव्ह आली त्यानंतर त्यांना रुग्णालयातुन सुट्टी देण्यात आली. चेंबूरच्या पी. एल. लोखंडे मार्गवर असलेल्या त्यांच्या घरी परतल्यावर रात्री हंडोरे यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, स्पीकर लावून जंगी स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यानी केलेल्या गर्दीने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला गेला. तर अनेकांनी तोंडाला मास्क लावले नव्हते.


माजी मंत्र्यांनी ज्या कोरोनावर मात केली त्याच कोरोनाला पुन्हा निमंत्रण तर दिले. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून चेंबुरच्या जनतेला मदत करण्यासाठी चंद्रकांत हंडोरे विभागात फिरत होते आणि त्यात त्यांना कोरोनाची लागण झाली. परंतु काल रात्री साजरा झालेला हा जल्लोष मात्र त्यांचाच विभागाला कोरोनाच्या संकटात ढकलणार ठरू शकतो.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.