धक्कादायक ! भारतीय क्रिकेटमध्ये कोरोनाचा शिरकाव

    दिनांक  30-May-2020 18:59:45
|

cricket_1  H x
मुंबई : सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशामध्ये लॉकडाऊन आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. आता याच कोरोणाचा कहर भारतीय क्रिकेटमध्येही दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील निवड समिती सदस्याला करोना झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळेच आता भारताच्या क्रिकेटमध्येही करोनाने शिरकाव केल्याचे सांगितले आहे. एकीकडे क्रिकेट पुन्हा सुरु होण्याचे चिन्ह दिसत असतना यामुळे पुन्हा एकदा क्रीडाप्रेमींच्या या इच्छेवर ग्रहण लागते का? हा प्रश्न सतावू लागला आहे.
 
 
संघ निवडण्याचे काम निवड समितीचे असते. संघ निवडण्यासाठी सदस्य हे बऱ्याच ठिकाणी फिरत असतात. जिथे स्पर्धा किंवा सराव सुरु असतो, तिथे हे सदस्य जात असतात. त्यामुळे बऱ्याच लोकांशी त्यांचा संपर्क येत असतो. त्याचबरोबर संघ निवडताना एक बैठक बोलावली जाते. या बैठकीमध्ये सर्व निवड समिती सदस्य आणि संघाचे कर्णधार व प्रशिक्षकही असतात. त्यामुळे आता हे निवड समिती सदस्य ज्या व्यक्तींच्या संपर्कात आले आहेत त्यांनाही आता ही चाचणी करावी लागणार आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.