वेदनादायी दृश्य! भोपाळमध्ये बस स्टॉपवर आढळले कुपोषित मुल

30 May 2020 12:22:10
11_1  H x W: 0
 
 

नवी दिल्ली : लॉकडाऊनमध्ये कुपोषणाचे दाहक दृश्य उघडकीस आले आहे. एका झाडाच्या फांदी एवढा दिसणारे हे बाळ केवळ दहा दिवसांचे आहे. त्याचे वजन केवळ १.३ किलोग्राम असून भोपाळ पोलीसांना होशंगाबाद रोडवर एका बस स्थानकात रडताना आढळले. त्याच्या आईचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतू ती सापडली नाही. बाळाची नाजूक स्थिती पाहून पोलीसांनी त्याला रुग्णालयाला दाखल केला आहे.




11_1  H x W: 0


मातेला कुशीत घेऊन मातृभूमीकडे प्रवास


हे छायाचित्र सुरत येथील आहे. आईला चालायला त्रास होत असल्याने युवकाने तिला उचलून घेत स्थानकापर्यंतचा प्रवास केला. रणरणत्या उन्हात त्याने हा प्रवास केला.



11_1  H x W: 0



देशातील पहिले जुळे कोरोना योद्धे


गुजरातच्या वडनगर येथे १६ मे रोजी जुळ्या भाऊ बहिणीने जन्म घेतला. जन्मताच कोरोना झालेल्या या चिमुकल्याने कोरोनावर मात केली आहे. आई कोरोना पॉझिटीव्ह असल्याने मुलांनाही कोरोनाची लागण झाली. शुक्रवारी पहिल्यांदाच जन्मल्यानंतर इतक्या दिवसांनंतर आईला मुलांना पाहता आले. दोघांचे नाव सुवास आणि स्वरा ठेवण्यात आले आहे. आता तिघेही सुखरुप आहेत. आई आणि दोन्ही बाळ रुग्णालयात वेगवेगळे राहत होते.




11_1  H x W: 0





'सोशल डिस्टंसिंग वेडींग'

मध्य प्रदेशच्या उज्जैन येथे मंगलनाथ मंदिर परिसरात शुक्रवारी सकाळी १० वाजता चिंतापण नगर येथील शिवानी आणि धार येथील मंगलनाथ परिसरात हे लग्न पार पडले. सरकारने दिलेल्या निर्देशानुसार दहा लोकांपेक्षा जास्त नातेवाईकांना या ठिकाणी उपस्थित राहता आले नाही. पोलीसही येथे तैनात होते. लग्नात केवळ आठ लोक उपस्थित होते.




Nanded _1  H x


१०० मिनिटांत भरतो एक घडा, विहीर ५० फूट खोल


नांदेडच्या जांभळीतांडा गावातील हे दृश्य आहे. गावातून दोन किमी दूरवर एक विहीर असून सुमारे ५० फूट खोल उतरून त्यातून पाणी काढावे लागते. एक घडा पाणी भरण्यासाठी सुमारे शंभर मिनिटे लागतात, तो घडा घरी घेऊन जाईपर्यंत तास सव्वातास लागतो.
 





Powered By Sangraha 9.0