मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. एन. देशमुख यांचे निधन

    दिनांक  29-May-2020 16:08:47
|
B N Deshmukh_1  

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती, माजी आमदार बॅ. बलभिमराव नरसिंगराव (बी. एन.) देशमुख काटीकर यांचे गुरुवारी मध्यरात्री औरंगाबाद येथे निधन झाले. मृत्यूसमयी ते ८५ वर्षांचे होते.


बी. एन. देशमुख यांची उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकिली करत असताना राज्य विधान परिषदेवर निवड झाली होती. त्यानंतर त्यांची उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. त्यावेळी देशमुख यांनी शेतकरी, कष्टकरी, कामगार अशा सामाजिक प्रश्नावर ऐतिहासिक निर्णय दिले होते. देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी राज्यसभा सदस्य अॅड. नरसिंहराव देशमुख यांचे पुत्र होते.


न्यायमूर्ती बी. एन देशमुख यांचे मूळगाव तुळजापूर तालुक्यातील काठी होते. त्यांचे वडील उस्मानाबाद येथे वकिली व्यवसाय करीत असत. देशमुख यांचे उच्च शिक्षण इंग्लंड मध्ये झाले. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात रामराव आदिक यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली व्यवसायास सुरुवात केली. औरंगाबाद येथे खंडपीठ सुरु झाल्यानंतर त्यांनी तेथे वकीलीला प्रारंभ केला. १९८६ मध्ये देशमुख यांची न्यायमूर्तीपदी नेमणूक झाली. १९९७ साली ते उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून निवृत्त झाले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.