माकडानं पळवली कोरोना टेस्ट सॅम्पल

29 May 2020 19:12:24
2_1  H x W: 0 x





मेरठ : कोरोना चाचणी करण्यासाठी घेण्यात आलेले रुग्णांचे तीन सॅम्पल्स माकडांनी पळवल्याचा धक्कादायक प्रकार मेरठ मेडिकल कॉलेजच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये घडला आहे. माकडांची टोळी या महाविद्यालयाच्या परिसरात दिसते, कोरोना चाचण्या आणि रुग्णांची शुश्रूशा यात याकडे गेले काही दिवस कुणाचेही लक्ष गेलेले नव्हते. मात्र, माकडांनी शुक्रवारी सकाळी कोरोना चाचणीसाठी घेतलेले नमुने पळवले आणि सर्वच चक्रावून गेले. 






उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये हा प्रकार घडला. माकडांनी कोरोना सॅम्पल हातात घेऊन या परिसराचा चांगलाच फेरफटका मारला. त्यामुळे जिथे जिथे माकडं नाचली तिथे विषाणू पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही काळ परिसरात भयंकर हाहाकार उडाला. घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. माकडांचा सुळसुळाट असलेल्या या भागात वारंवार अशा वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. मेरठ मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, माकडांचा त्रास परिसरात जाणवत असतो. दरम्यान हा प्रकार कुणाच्या निष्काळजीपणामुळे घडला याचा तपास सध्या सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0