१ जूनला मान्सून केरळात ; महाराष्ट्रात कधी ?

    दिनांक  29-May-2020 11:52:54
|

mansoon_1  H x
 
मुंबई : उकाड्याने त्रस्त झालेल्या महाराष्ट्रासाठी एक चांगली बातमी. ती म्हणजे १ जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. तर, राज्यामध्ये ८ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे, कोरोनाच्या संकटात यंदाचा मान्सून अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. १ जूनला केरळमध्ये मान्सून दाखल व्हायला वातावरण पोषक, असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
 
 
३० तारखेपासून पुढील तीन दिवस राज्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्य्ता आहे. ३० तारखेनंतर मान्सूनपूर्व हालचाली वाढण्याची शक्यता आहे. पुणे हवामान विभागाचे डॉ. अनुपम काश्यपी यांनी ही माहिती दिली. पुणे, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील तापमानात घट होणार आहे. पश्चि म भागातील हवा वाहू लागल्यानंतर पुण्यातील तापमान ४० अंशाखाली येईल. तर विदर्भातही ३० तारखेपर्यंत तापमान कमी होईल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात २९ आणि ३० तारखेला तापमानाचा पारा खाली येऊ शकतो.
 
 
३१ मे आणि १ जूनला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल आणि कोकण-गोव्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, रत्नागिरी-सिंधुदुर्ग भागात जास्त पाऊस पडेल, असा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. कोरोना आणि आर्थिक मंदी यामुळे त्रस्त असलेल्या महाराष्ट्राला मान्सूनमुळे थंडावा मिळतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.