अजित पवार म्हणतात राज्य सरकार देणार मोठे आर्थिक पॅकेज

    दिनांक  29-May-2020 15:14:59
|

maharashtra_1  
पिंपरी : सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या वादळामुळे बऱ्याच उद्योगांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या ओढवलेल्या आर्थिक संकटात सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार लवकरच पॅकेज जाहीर करणार आहे. अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पीसीएनटीडी'तर्फे औंध ते काळेवाडी साई चौक येथे उभारण्यात आलेल्या पुलाचे त्यांचे हस्ते शुक्रवारी उद्घाटन झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
 
 
“करोनामुळे गेले दोन ते अडीच महिने सर्वच कामकाज व व्यवहार ठप्प आहे. याचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. राज्यात मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार लवकरच पॅकेज देणार आहे. मंत्रिमंडळाची बैठक घेऊन त्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल” असे त्यांनी यावेळी सांगितले
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.