‘बुक माय शो’मधील २७० कर्मचाऱ्यांवर गदा

29 May 2020 11:15:32

BMS_1  H x W: 0
नवी दिल्ली : कोरोनाच्या प्रादुर्भावाचा कहर थांबायचे नाव घेत नाही आहे. यामुळे लॉकडाऊन वाढत असल्याने सर्वच क्षेत्रांना फटका बसत आहे. प्रसिद्ध ऑनलाईन तिकिट बुकिंग प्लॅटफॉर्म ‘बुक माय शो’ कंपनीने २७० कर्मचाऱ्यांना अनिश्चित काळासाठी रजेवर पाठवले आहे. सध्या चालू असलेल्या लॉकडाऊनमुळे येत्या काही महिन्यात ऑनलाईन तिकिटे बुक करण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता कंपनीने वर्तवली आहे. यामुळे कंपनीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. म्हणून कंपनीने हा निर्णय घेतला.
 
 
‘बुक माय शो’चे मुख्य कार्यकारी आशिष हेमराजा यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, “आम्हाला आमच्या खर्चाचे प्रमाण कमी करावे लागेल. येत्या काही महिन्यात कंपनीच्या कमाईमध्ये घट होणार आहे. बुक माय शो कंपनीमध्ये भारतासह जगभरात १ हजार ४५० कर्मचारी काम करतात. त्यापैकी वेगवेगळ्या गट आणि इतर कामे करणाऱ्यांपैकी साधारण २७० कर्मचाऱ्यांना याचा फटका बसला आहे. असे असले तरीही या कर्मचाऱ्यांच्या हिताची काळजी घेण्याचाही तितकाच प्रयत्न कंपनीने केला आहे. त्यांना काही प्रमाणात आर्थिक पाठबळ, आरोग्य विमा, इतर ठिकाणी रोजगाराची संधी देण्याचाही प्रयत्न केला आहे.”
Powered By Sangraha 9.0