अग्निशमन दलावर कोरोनाची वक्रदृष्टी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-May-2020
Total Views |
Fire brigade_1  

तिसऱ्या जवानाही मृत्यू; ४१ जवानांना कोरोनाची लागण



मुंबई : जबरदस्त आत्मविश्वासाने प्रतिकार करणाऱ्या अग्निशमन दलावरच आता कोरोनाची वक्रदृष्टी वळली आहे. आठ दिवसांपूर्वी एक जवान धारातीर्थी पडल्यानंतर गुरुवारी लागण झालेल्या दोघांपैकी एकाचा रात्री उशिरा मृत्यू झाला.


कोरोनायोद्धे म्हणून काम करणारे मुंबई अग्निशमन दलाचे कर्मचारीच आता कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. ४१ जवानांना कोरोनाची लागण झाली असून तिघांवर आयसीयूत उपचार सुरु आहेत. तर तिघांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे अग्निशमन दलात चिंतेचे वातावरण आहे.


कोरोनावर मात करण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान अहोरात्र काम करत आहेत. पण कोरोनानेच आता अग्निशमन दलातील शिरकाव केला आहे. आतापर्यंत ४१ जणांना कोरोनाची लागण झाली असून तीन जण दगावले आहेत, तर तिघांनी कोरोनावर मात केली आहे. १४ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर २२ जणांवर उपचार सुरु असून तिघांवर आयसीयूत उपचार सुरु असल्याचे अग्निशमन दलाचे प्रमुख डॉ. प्रभात रहांगदळे यांनी सांगितले.


कोरोनावर मात करण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान ठिकठिकाणी जंतुनाशक फवारणी करत आहेत. परंतु ही जंतुनाशक फवारणी जवानांच्या जीवावर बेतू लागली आहे. त्यामुळे या जवानांच्या सुरक्षेकडे अधिक लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
@@AUTHORINFO_V1@@