एपीएमसी मार्केटमधील सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण!

29 May 2020 15:46:59

APMC_1  H x W:



१२ सुरक्षारक्षक कोरोनाबाधित; प्रशासनाकडून खाजगी सुरक्षारक्षकांची नेमणूक




नवी मुंबई : एपीएमसी मार्केटमध्ये तैनात असलेल्या १२ सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाल्यामुळे मार्केटमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. १२ सुरक्षारक्षकांना कोरोना झाल्यानंतर त्यांच्या जागी एपीएमसी प्रशासनाने आता खासगी सुरक्षारक्षक नेमेले आहेत.


नवी मुंबई महानगरपालिकेच्या ताज्या आकडेवारीनुसार एपीएमसी मार्केटमध्ये काम करणारे किंवा त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित ५९० कोरोनाबाधित प्रकरणे आहेत. अशा कठीण परिस्थितीत एपीएमसीच्या नियमित १२ सुरक्षारक्षकांची चाचणीही पॉझिटीव्ह आल्याने प्रशासनाने खबरदारी न घेता थेट खासगी सुरक्षारक्षकांची निवड केली आहे. या खासगी सुरक्षारक्षकांना नियमित सुरक्षारक्षकांच्या पगाराच्या दुप्पट रक्कम देऊन त्यांना मार्केटमध्ये तैनात करण्यात आहे.


कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या १२ सुरक्षाराक्षकांव्यतिरिक्त, लॉकडाऊन कालावधीत गैरहजर राहिलेल्या ४२ सुरक्षारक्षकांना प्रशासनाने महाराष्ट्र सुरक्षा मंडळाकडे परत पाठविले आहे. त्यामुळे खासगी बाऊन्सर घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याचे एपीएमसीचे सुरक्षा अधिकारी अविनाश काकडे यांनी सांगितले.


Powered By Sangraha 9.0