कोरोना संकटात बँक कर्मचाऱ्यांना कुणी वाली आहे का ?

28 May 2020 19:53:10
Bank _1  H x W:




कर्मचारी संघटनांचा सवाल

मुंबई : देशाचे अर्थचक्र सुरू राहावे, कोरोनाच्या संकटात जनता आर्थिक अडचणींमुळे व्यथित होऊ नये, म्हणून बँक कर्मचारी अखंड सेवा देत आहेत. मात्र, या संकटाशी लढताना अनेक कोरोना योद्ध्यांना आपल्या प्राणांना मुकावे लागले आहे. बँकींग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कुणी वाली आहे का ?, आम्हाला पुरेसे विमा संरक्षण मिळणार आहे का ?, असा सवाल बँक कर्मचारी संघटनांनी विचारला आहे.
सध्या मुंबई कोरोनाचा हॉटस्पॉट बनली आहे. बहुसंख्य बँक कर्मचारी मुंबई उपनगरात राहातात. त्यांना कामासाठी मुंबई शहरात यावे लागते. लोकल सेवा खंडीत असताना कामावर पोहोचण्यासाठी करावी लागणारी कसरत, अपुऱ्या बस सेवा त्यातच कोरोनाची लागण होण्याची भीती इतके दडपण असूनही बँक कर्मचारी अखंड सेवा देत आहेत. 
बँक कर्मचाऱ्यांना राज्य परिवहन महामंडळाचा बसमध्ये प्रवेश दिल्या जात नाही. त्यामुळे उपनगरातील अनेक कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून घरीच बसावे लागले. सरकार बँक कर्मचाऱ्यांकडून अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या सेवा घेत आहे पण तो दर्जा मात्र द्यायला तयार नाही त्यामुळेच ५० लाख रुपयांची विमा सुरक्षितता देखील त्यांना उपलब्ध करून दिली नाही. 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला उद्देशून केलेल्या कुठल्याच भाषणात बँक कर्मचाऱ्यांची साधी दखल घेतली नाही. लॉकडाऊन काळात मुंबई शहरात ५ बँक कर्मचऱ्यांनी (२ स्टेट बँकेचे, १ आयडिबी आय १ पंजाब नॅशनल बँक १ फेडरल बँक) कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 
आता सरकार अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी लोकल रेल्वे सेवा सुरू करू पाहत आहे. तेव्हा बँक कर्मचाऱ्यांना त्याद्वारे प्रवासाची सोय उपलब्ध करून दिली पाहजे तसेच राज्य परिवहन महामंडळाला तश्या सूचना दिल्या पाहजेत अशी माफक आपेक्षा संघटनेतर्फे करण्यात येत आहे. 



Powered By Sangraha 9.0