पुलवामा पोलिसांनी उधळला दहशतवाद्यांचा मोठा कट

28 May 2020 13:41:28

jammu kashmir_1 &nbs
 
 
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दलांनी पुलवामासारखा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला आहे. पुलवामा जिल्ह्यात एका पांढऱ्या सेंट्रो गाडीमधून २० किलो आयईडी जप्त करून ते नष्ट करण्यात आले. ही गाडी पुलवामातील राजपुरा रोडवर शादीपुरा येथे मिळाली होती.
 
 
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, काही दहशतवादी स्फोटकांनी भरलेल्या गाडीमधून जात असल्याची माहिती पुलवामा पोलिसांना बुधवारी उशिरा रात्री माहिती मिळाली होती. याद्वारे काही ठिकाणी दहशतवादी हल्ले केले जाऊ शकतात. सुरक्षा दलाने तातडीने कारवाई करून सर्व मार्गावर नाकाबंदी केली. यावेळी एक संशयास्पद गाडी आढळल्यानंतर चौकशी दरम्यान गोळीबार झाला. यात चालक अंधाराचा फायदा घेत तेथून फरार झाला. मात्र, सुरक्षा दलाने गाडी जप्त केली आहे. हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी ही गाडी चालवत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
Powered By Sangraha 9.0