शाळा, कॉलेज सुरु करण्यास परवानगी नाही ; केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

27 May 2020 11:00:15

school_1  H x W
 
मुंबई : सध्याच्या घडीला देशामध्ये शाळा आणि महाविद्यालये चालू होणार का? असा मोठा प्रश्न पालक तसेच शिक्षकांना पडलेला होता. यावर आता केंद्रीय गृह मंत्रालयाने अद्याप शाळा, महाविद्यालये सुरु करण्यास परवानगी नाही असे स्पष्ट केले आहे. सर्व राज्यांना शाळा सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यम्यांनी दिल्याने आणि सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले असून असा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
 
 
“केंद्रीय गृहमंत्रालयाकडून असा कोणताही निर्णय़ घेण्यात आलेला नाही. देशभरातील सर्व शैक्षणिक संस्थांवर अद्यापही निर्बंध कायम आहेत.” असे ट्वीट करून माहिती देण्यात आली आहे. राज्य शासनाने सद्यस्थितीत शाळा सुरू केल्या तरी पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाहीत. लहान मुलांची प्रतिकारक क्षमता कमी असल्यामुळे कोरोनाचा फैलाव वाढण्याचा धोका अधिक आहे. शासनाने सध्या ऑनलाईन शिक्षणावरच अधिक भर देण्याची गरज आहे. त्यामुळे १५ जूनपासून शाळा सुरु होणार आहेत अशा अफवांवर विश्वास ठवू नका असे सांगण्यात आले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0