पंतप्रधान नरेंद्र मोदींची लष्करप्रमुखांसोबत बैठक!

27 May 2020 12:26:13

modi_1  H x W:


चीनसोबत तणाव; तिन्ही दलांनी दिल्या तयारीच्या ब्लूप्रिंट



नवी दिल्ली: चीनसोबत सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखमधील परिस्थितीचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्यदलाकडून या सध्याच्या परिस्थितीबाबत पर्याय मागवले आहेत. तिन्ही सैन्यदलाकडून लडाखमधील परिस्थितीबाबत पंतप्रधानांना एक अहवाल देखील देण्यात आला आहे. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालदेखील उपस्थित होते. लडाख सीमारेषेपलीकडून चीनकडून सुरु असलेल्या हालचालीमुळे भारत-चीन यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारताकडून देखील तयारीचा आढावा घेतला जात आहे. मंगळवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील बैठक घेतली होती.


पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत तिन्ही दलांकडून सध्याच्या परिस्थितीबाबत देण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये जवळ असलेले डिफेंस असेट्स आणि तणाव वाढल्याच्या स्थितीनंतर रणनीती काय असावी? याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तिन्ही दलांकडून आपापल्या तयारीबाबतच्या ब्लूप्रिंट देखील पंतप्रधानांना सोपवल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि लष्करप्रमुख बिपिन रावत यांच्याकडून याबाबत माहिती घेतली आहे.


लडाख सीमारेषेपलीकडून चीनकडून सुरु असलेल्या हालचालीमुळे भारत-चीन यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारताच्या सीमेलगत चीनकडून होणाऱ्या हालचालीच्या पार्श्वभूमीवर भारताने आक्रमक पवित्रा घेतला आहे. लडाखमधील गलवा आणि पेंगोंग त्सो परिसरात अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले आहे. गेल्या महिन्याभरात चीनने भारताच्या सीमेत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे.
Powered By Sangraha 9.0