देशात दीड लाखांहून अधिक कोरोनाबाधित पण...

27 May 2020 11:35:13

corona_1  H x W
नवी दिल्ली : देशभरामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा १ लाख ५१ हजारांपेक्षा जास्त झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सकाळी आकडेवारी जाहीर केली. यानुसार आता देशात एकूण रुग्णांची संख्या ही १ लाख ५१ हजार ७६७ रुग्ण आहेत. यामधील ४ हजार ३३७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर महत्त्वाची बाब म्हणजे ६४ हजारांपेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत.
 
 
देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासात कोरोनाचे ६ हजार ३८७ नवीन रुग्ण समोर आले आहेत. तर १७० लोकांचा मृत्यू झाला आहे. आता देशात ८३ हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह केस आहेत. महाराष्ट्रात एकूण संक्रमितांचा आकडा ५४ हजार ७५८ एवढा झाला आहे. यामधील १७९२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तामिळनाडूमध्ये कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या १७ हजारांपेक्षा जास्त झाली आहे. येथे आतापर्यंत १२७ लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र आणि तामिळनाडूनंतर गुजरातमध्ये कोरोनाचा संसर्ग सर्वात जास्त पसरत आहे. आता येथे एकूण रुग्णांची संख्या १४ हजार ८२१ झाली आहे. यामधील ९१५ जणांचा मृत्यू झाला आहे.
 
 
दिल्लीमध्येही एकूण कोरोना रुग्णांचा आकडा १४ हजार ४६५ एवढा झाला आहे. येथे आतापर्यंत २८८ लोकांचा मृत्यू झाला आहे. या व्यतिरिक्त राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात संक्रमण झपाट्याने वाढत आहे. राजस्थानमध्ये एकूण कोरोना रुग्णांची संख्या ७५३६ एवढी आहे. यामध्ये १७० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर मध्य प्रदेशात एकूण रुग्णांचा आकडा ७०२४ एवढा आहे. यामध्ये ३०५ लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात एकूण कंफर्म केसेसची संख्या ६५४८ एवढी आहे. यामध्ये १७० लोकांचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये रुग्णांचा आकडा २९८३ आहे. यामध्ये १३ लोकांचा मृत्यू झाला आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0