मुंबईतील ‘हे’ प्रसिद्ध गणेश मंडळ यंदा गणेशोत्सव साजरा करणार नाही!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2020
Total Views |
GSB_1  H x W: 0

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव समितीचा मोठा निर्णय!

मुंबई : यंदा कोरोनाचे मोठे संकट देशासह जगावर कोसळले आहे. कोरोनामुळे सर्व धार्मिक उत्सव रद्द केले जात असतानाच आता गणेशोत्सवाच्याबाबत सुद्धा एक मोठा निर्णय समोर येत आहे. मुंबईतील प्रमुख गणेशोत्सव मंडळांमधील एक म्हणजेच वडाळा जीएसबी मंडळाने यंदा भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या ऐवजी माघ महिन्यात म्हणजेच जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान हे कोरोनाचे संकट टळल्यांनंतर जोरदार उत्सव करू, असे मंडळातर्फे सांगण्यात आले आहे. साहजिकच यामुळे गणेशभक्तांची निराशा झाली आहे.


यंदा गणेशोत्सव साजरा करण्याबाबत जीएसबी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले की, कोरोनाचे भीषण संकट असताना सोशल डिस्टंसिंग पाळणे हे अनिवार्य आहे, मात्र गणेशोत्सव झाल्यास या नियमाची अंमलबजावणी करणे जवळपास अशक्यच होउ शकते. दरवर्षीच्या लाखोंच्या गर्दीने भाविक गणपतीच्या दर्शनाला येतात, अशावेळी स्वयंसेवकांना सुद्धा त्यांना हाताळणे कठीण होईल. एकूणच नियम मोडला जाणार नाही या हेतूने यंदाचे सेलिब्रेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेत आहोत.


दरम्यान, यापूर्वी बृहन्मुंबई महानगरपालक गणेशोत्सव समन्वय समितीतर्फे गणेशोत्सव साजरा करण्याला हिरवा कंदील दाखवण्यात आला होता. कोरोना असला तरी साध्या पद्धतीने का होईना गणेशोत्सव होईलच असे या समितीने सांगितले होते. सर्व मंडळांना व भाविकांनी नियम पाळल्यास आपण नक्कीच गणेशोत्सव साजरा करू शकतो असा विश्वाशी दर्शवण्यात आला होता. मात्र वडाळ्याच्या जीएसबी मंडळाने स्वेच्छेने यंदा गणेशोत्सव पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे यानंतर आता मुंबईतील अन्य मंडळे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
@@AUTHORINFO_V1@@