केंद्राकडून इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला जास्तच मिळालं आहे : देवेंद्र फडणवीस

    दिनांक  26-May-2020 17:06:08
|

devendra fadnavis_1 केंद्र सरकारने महाराष्ट्राला कोरोना लढ्यात २८,१०४ कोटी रूपये दिलेत : देवेंद्र फडणवीसमुंबई
: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार केंद्र सरकार निधी अडवत असल्याचा आरोप वारंवार आपल्या भाषणातून करत आहेत याला विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले. ऑनलाईन पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारने महाराष्ट्राला या काळात २८,१०४ कोटी रूपये दिलेले आहेत त्यामुळे केंद्राने राज्य सरकारला काहीच मदत केली नाही असे ठाकरे सरकार केवळ जनतेला भासवत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 


अन्नधान्यासाठी केंद्रसरकारकडून मिळालेला निधी


त्याचबरोबर शेतमाल खरेदीसाठी देखील केंद्राकडून निधी देण्यात आला आहे. यापैकी कापूस खरेदीसाठी ५६४७ कोटी रूपये, धान खरेदीसाठी २३११ कोटी रूपये, तूर खरेदीसाठी ५९३ कोटी रूपये, चणा/मका खरेदीसाठी १२५ कोटी रुपये तर पीकविम्यासाठी ४०३ कोटी रूपये असे एकूण ९०७९ कोटी रूपये केंद्र सरकारने राज्याला दिले आहेत. त्याचबरोबर गरीब कल्याण पॅकेजच्या अंतर्गत १७५० कोटींचा गहू, २६२० कोटींचा तांदूळ, १०० कोटींची डाळ दिली गेली.

जीएसटीसंदर्भात मनात येतील ते आकडे राज्याकडून सांगितले  जात आहेत.


डिव्हॅल्यूलेशन ऑफ टॅक्सेसच्या माध्यमातून ५६४८कोटी रूपये देण्यात आले. केंद्र सरकारच्या पॅकेजमध्ये एमएसएमई/गृहनिर्माण/डिस्कॉम/नरेगा/आरआयडीएफ/कॅम्पा एम्पॉयमेंट/स्ट्रीट वेंडर्स/फार्मगेट इन्फ्रा, मायक्रो फूड एन्टरप्राईजेस, पशुसंवर्धन इत्यादींतून किमान ७८,५०० कोटी रूपये महाराष्ट्राला मिळतील. असेही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच जे मिळाले ते २८ हजार कोटी रूपये केंद्राच्या निर्णयांमुळे महाराष्ट्राला जो निधी उभारता येऊ शकतो, तो १,६५ ,००० कोटी रूपये आणि केंद्राच्या पॅकेजमधील ७८ जार कोटी रूपये असे एकूण २,७१,५०० कोटी रूपयांचा लाभ होऊ शकतो. आता गरज आहे ती धाडसी निर्णयांची असे म्हणत त्यांनी राज्य सरकारला टोला लगाविला.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.