लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांसाठी केंद्र सरकारची भरीव मदत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2020
Total Views |

piyush goyel_1  



मुंबई :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार केंद्र सरकार निधी अडवत असल्याचा आरोप वारंवार आपल्या भाषणातून करत आहेत याला विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले. ऑनलाईन पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारने महाराष्ट्राला या काळात २८,१०४ कोटी रूपये दिलेले आहेत त्यामुळे केंद्राने राज्य सरकारला काहीच मदत केली नाही असे ठाकरे सरकार केवळ जनतेला भासवत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.




लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांनाही सरकारने भरीव मदत केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 'आतापर्यंत राज्यातून ६०० श्रमिक विशेष रेल्वे गाड्या सुटल्या आहेत. प्रत्येक रेल्वे गाडीवर केंद्राने जवळपास ५० लाख रुपये खर्च केले आहेत. आणि राज्य  या मजुरांच्या तिकिटांवर खर्च करत आहे तो खर्च आहे ७ ते ९ लाख रुपये आहे. त्यामुळे श्रमिक रेल्वे गाड्यांवर केंद्र सरकारने  ३०० कोटींचा खर्च झाला आहे. मजुरांच्या छावण्या, त्यांचे अन्नधान्य यासाठी केंद्रानेच एसडीआरएफच्या माध्यमातून १ हजार ६११ कोटी रुपये दिले. केंद्राकडून राज्याला १० लाख पीपीई किट्स आणि १६ लाख एन ९५ मास्क देण्यात आले. याशिवाय इतर वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी ४४८ कोटी दिले गेले,' अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
@@AUTHORINFO_V1@@