केंद्राने आरोग्य सुविधांसाठीदेखील मदत दिली : देवेंद्र फडणवीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2020
Total Views |

Devendra_1  H x



आरोग्य सेवांसाठी एकूण ४६८ कोटींची मदत केंद्राकडून राज्याला देण्यात आली!


मुंबई : केंद्राची प्रतिमा मलीन केली जात आहे, केंद्राने सर्व राज्यांना मदत केली आहे. राज्यात खोटा प्रचार केला जात असून अन्यायाचे वातावरण तयार केले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कोरोनाच्या या परिस्थितीत केंद्राकडून वेगवेगळ्या मार्गाने मदत होत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. मंगळवारी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन पत्रकार परिषद घेतली.


आता महाराष्ट्राची कोरोना परिस्थिती अतिशय वाईट आहे. केंद्राने राज्याला आरोग्य सुविधांसाठी देखील मोठी मदत यापूर्वीही केली होती आणि आत्ताही करत आहे. महाराष्ट्राला केंद्राकडून आत्तापर्यंत  ४७ लाख २० हजार हायड्रोक्सिक्लोरोक्विनचा पुरवठा केला गेला आहे. ९.८८ लाख पीपीई किट्स, १५.५९ लाख एन-९५ मास्कचा पुरवठा केंद्राकडून करण्यात आला. एकूण ४६८ कोटींची मदत केंद्राकडून राज्याला देण्यात आली आहे. राज्यात ४१ शासकीय तर ३१ खासगी प्रयोगशाळांना मान्यता देण्यात आली आहे.






महाराष्ट्रातील कोरोना स्थिती अतिशय वाईट आहे. रूग्णसंख्या आणि मृत्यूदर यात मोठी वाढ होताना दिसते आहे. महाराष्ट्रात आता चाचण्यांची संख्या अतिशय कमी करण्यात आली आहे. काल केवळ २९०० चाचण्या केल्या आहेत. आता एकूण चाचण्यांपैकी ३२ टक्के रूग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. एकूण सकारत्मक रुग्णांपैकी ४० टक्के रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रात असल्याचेही यावेळी देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.




@@AUTHORINFO_V1@@